राज्यात सध्या एलपीजी गॅसचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण (shortage of LPG gas) झाल्याचे चित्र दिसत आहे. सरकारकडून पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सी आणि पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून सिलेंडरसाठी रांगेत उभे राहत आहेत. ऑनलाईन गॅस बुकिंग होत नसल्याने चाकरमान्यांना मोठी अडचण निर्माण झाली असून दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

जळगाव शहरातही ही परिस्थिती (shortage of LPG gas) तीव्र झाली आहे. इच्छा देवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावर रिक्षा चालकांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. शहरात एकूण तीन एलपीजी पंप असले तरी त्यापैकी दोन पंपांवरील गॅस संपल्याने सध्या एकच पंप सुरू आहे. त्यामुळे गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांना दोन ते तीन तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

गॅसचा तुटवडा असतानाच दरवाढीमुळे रिक्षा चालकांचे आर्थिक (shortage of LPG gas) गणितही बिघडले आहे. काही काळापूर्वी एलपीजी गॅसचा दर किलोमागे सुमारे ५५ रुपये होता. मात्र आता तो वाढून सुमारे ९० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. या अचानक झालेल्या वाढीमुळे रिक्षा चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सध्याच्या परिस्थितीत रिक्षा चालवणे परवडत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दरवाढीमुळे भाडेवाढही झाली असून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांनाही बसत आहे.

इगतपुरी शहरातही (shortage of LPG gas) व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील अनेक हॉटेल व्यवसायिकांना पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. काही हॉटेलांनी मेनूमध्ये कपात केली असून काहींनी तात्पुरते हॉटेल बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. आधीच आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरत आहे.

दरम्यान, राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया (shortage of LPG gas) मागील दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी मोटार वाहन विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली आहे. सध्याच्या गॅस तुटवड्यामुळे राज्यातील वाहतूक, हॉटेल व्यवसाय आणि सर्वसामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *