कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सुरू झालेले इजराइल अमेरिका (drag) आणि इराण यांच्यातील युद्ध थांबणार नाही तर लांबणार आहे असे संकेत दोन्हीही बाजूंनी दिले जात आहेत. त्यामुळे पश्चिम आशियाई देशातील सर्वसामान्य जनतेचे हाल अधिक तीव्र होणार आहेत. इजराइल आणि अमेरिका या दोघांनी संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी व त्यांचे वरिष्ठ सहकारी ठार झाले. आता इराणकडे युद्धाच्या संदर्भात निर्णय घेणारा सर्वोच्च नेता हयात नसल्यामुळे इजराइल अमेरिकेची काहीशी अडचण झाली आहे. अली खामेनी यांचे सुपुत्र मोजतबा यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झालेली असली तरी, ते या युद्धाच्या संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतील असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलेली भूमिका ही युद्ध थांबवणारी नसून लांबवणारी आहे.

इराणच्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा केल्यानंतर दोन-चार दिवसातच इराण सरेंडर होईल.(drag) आणि युद्ध समाप्त होईल असे इजरायल अमेरिकेला वाटत होते. मात्र प्रत्यक्षात इराण सरेंडर झाला नाही उलट त्याने एकाच वेळी अनेक देशाविरुद्ध आघाडी उघडून आम्ही आता मागे हटणार नाही असा संदेश दिला. त्यांच्या ताब्यातील समुद्री मार्ग सर्व देशांसाठी बंद केल्यामुळे, पश्चिम आशियाला वेगळ्या संकटात टाकले आहे. आणि या संकटाशी सामना कसा करायचा असा सवाल भारतासह अनेक देशांना पडला आहे अमेरिकेचे 47 वेअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली असून ती पूर्ण करणे हे माझ्यासाठी सन्मानजनक असेल असेच स्फोटक वक्तव्य करून अप्रत्यक्षपणे हे युद्ध लांबवण्याची भूमिका घेतलेली आहे. एखाद्या सार्वभौम राष्ट्राला नष्ट करण्याची घोषणा करणे किंवा तशी इच्छा व्यक्त करणे हे समर्थनिय नाही. त्यांच्या या वक्तव्याचा निषेधच केला पाहिजे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार मारल्यामुळे, युद्धविषयक निर्णय घेणारानेताच शिल्लक राहिलेला नाही. आणि तो शिल्लक नसल्यामुळे युद्ध लांबणार नाही हा इजरायल अमेरिकेचा विश्वास गैर ठरलेला आहे असे म्हणता येईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरण येण्याचे आवाहन या (drag) गेल्या दहा-बारा दिवसात किमान दोन ते तीन वेळा केले आहे. शिवाय इराणने सर्वोच्च नेत्याची केलेली निवड ही ट्रम्प यांना मान्य नाही. त्यांना हवे असलेले सरकार इराणमध्ये हवे आहे. ट्रम्प यांची ही भूमिका वसाहत किंवा विस्तारवादाची आहे. जे व्हेनेझुएला मध्ये केले तेच आपण इराणमध्ये करू हा त्यांचा भ्रम ठरला आहे.इराणने युद्ध समाप्ती हवी असेल तर आमच्या काही शर्ती आहेत त्या तुम्ही मान्य कराव्यात असे जाहीर केले आहे. आणि या शर्ती अमेरिका तसेच इजराइल केव्हाही मान्य करणार नाहीत हेही तितकेच खरे आहे. एका स्वतंत्र देशाचे राज्यकर्ते म्हणून आम्हाला असलेले अधिकार मान्य केले पाहिजेत, देशाची संरक्षण सिद्धता करण्याचा हक्क मान्य केला पाहिजे, आण्विक कार्यक्रमाबद्दलचे अधिकार मान्य केले पाहिजेत ही इराणच्या अध्यक्षांनी पहिली अट इजराइल अमेरिकेसमोर ठेवली आहे. तुमच्यामुळे सुरू झालेल्या युद्धात इराणची जी हानी झाली आहे ती रोख स्वरूपात दिली पाहिजे, जशी पहिल्या महायुद्धात जर्मनीने दिली होती आणि आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत, आमच्यावर भविष्यात कोणत्याही प्रकारचा हल्ला करणार नाही असे लिहून दिले पाहिजे अशा एकूण तीन अटी इराणने इजराइल आणि अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत.

इजराइल आणि अमेरिका या दोन बलाढ्य शक्ती समोर आम्ही झुकलेलो नाही, (drag)झुकणार नाही असा एक संदेश इराणच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला अप्रत्यक्षपणे दिलेला आहे असे म्हणता येईल. अर्थातच या तीन पैकी एक अट जरी मान्य केली तर तो इजराइल आणि अमेरिकेचा पराभव आहे असा त्याचा अर्थ काढला जाईल. आणि त्यामुळेच इराणच्या या अटी फेटाळून लावल्या जातील. इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या अटी या अपमान जनक आहेत आणि इराणला नष्ट करण्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे असे वक्तव्य करणे हे स्वतंत्र राष्ट्राची मानहानी करण्यासारखे आहे. एकूणच हे दोन्ही घटक आजच्या घडीला तरी युद्धखोर आहेत असे म्हणता येईल. दोघांनाही युद्ध थांबवायचे नाही तर वाढवायचे आहे, लांबवायचे आहे असे दिसते.
युद्धाच्या वनव्यातून पश्चिम आशियाला वाचवायला हवे अशी भूमिका घेऊन नरेंद्र मोदी यांनी काही देशांशी संवाद साधलेला आहे, विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. हे युद्ध थांबवण्याची, युद्धात गुंतलेल्या राष्ट्र प्रमुखांना वाटाघाटीच्या टेबलावर आणण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने संयुक्त राष्ट्र संघावर आहे मात्र या संदर्भात संघाच्या प्रमुखांकडून कोणतीही भूमिका जाहीर केली गेलेली नाही हे दुर्दैवी आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *