राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(effective) राष्ट्रीय महामार्गावरुन वारंवार प्रवास करत असेल तर तुम्हाला टोल पास उपयोगी ठरतो. मात्र, आता या पासच्या किंमती वाढणार आहे. १ एप्रिलपासून तुम्हाला वार्षिक फास्टॅग पाससाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. हा प्रवास महागणार आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने याबाबत निर्णय घेतला आहे. या टोल किंमतीत वाढ केली आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या वार्षिक टोल पासची किंमत ३००० रुपयांवरुन ३०७५ रुपये करण्यात आली आहे.

हे दर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आहेत. हा पास फक्त खासगी वाहनांसाठी असतो.(effective) १ वर्षासाठी हा पास वापरु शकतात. १ एप्रिल २०२६ पासून पासच्या नवीन किंमती लागू होणार आहे.नवीन नियमानुसार, हा वार्षिक पास आता ३०७५ रुपयांचा असणार आहे. हा पास एक वर्षासाठी वापरता येणार आहे. याचसोबत २०० वेळा टोल क्रॉसिंग असणार आहे. जर तुम्ही २०० वेळा टोल क्रॉस केला तर या पासची वैधता संपणार आहे. जर असं केलं नसेल तर १ वर्षात ही मुदत संपणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल प्लाझा आणि अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.(effective) टोलवरुन जाणाऱ्या प्रवाशांना ही माहिती देण्यास सांगितले आहे. १ एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. पुढच्या वर्षभरासाठी वार्षिक टोल पासची किंमत ३०७५ रुपये असणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, टोल संबंधित दरांचे दरवर्षी पुनरावलोकन होणार आहे. यामध्ये सुधारणा केली जाईल.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *