मुंबईच्या अंधेरी भागात गोपनीयतेचा गंभीर भंग झाल्याची धक्कादायक घटना समोर (elevator) आली आहे. 36 वर्षीय एका महिलेने आपल्या राहत्या इमारतीतील लिफ्टमध्ये एका पुरुष मित्रासोबत घालवलेला खासगी क्षणाचा व्हिडिओ लीक होऊन व्हायरल झाल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ही घटना जानेवारी 2026 मध्ये घडली होती, मात्र 9 मार्च रोजी हा व्हिडिओ सोसायटीत व्हायरल झाल्याचे तिला लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला हा प्रकार तेव्हा समजला जेव्हा (elevator) सोसायटीतील काही रहिवासी तिची सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवत होते आणि त्या विशिष्ट व्हिडिओचा उल्लेख करत होते. ती ज्यावेळी घरातून बाहेर पडायची तिला बघताच सोसायटीमधील मुले तिच्याकडे बघून हसायची आणि टिंगल टवाळखी करायचे.
यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने संबंधित महिलेने साकीनाका (elevator) पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आहे की सोसायटीच्या सीसीटीव्ही बॅकअपची जबाबदारी असलेल्या व्यक्तीनेच हे फुटेज मिळवून ते पसरवले असावे. महिलेच्या तक्रारीनुसार, हा व्हिडिओ केवळ सोसायटीतील ग्रुपमध्येच नव्हे तर सोसायटीबाहेरील लोकांनाही पाठवण्यात आला, ज्यामुळे तिला मोठा मानसिक त्रास आणि सामाजिक अपमान सहन करावा लागला आहे. या प्रकरणामुळे सोसायट्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणेच्या गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फुटेज लीक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?