बीडच्या परळीमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात (cloth) आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील धारावती तांड्यावर सदर घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन(cloth)नराधमांनी आपल्या घरी लाडाने बोलावून घराचा दरवाजा बंद करून एकाने मुलीचे हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबून ठेवला आणि तिच्यावर आळीपाळीने अतिशय निर्दयीपणे लैंगिक अत्याचार केले. तसेच कोणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकू असे धमकावून पीडित मुलीला सोडून दिले.
हा सर्व प्रकार त्या मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आई-वडिलांना सांगितला. (cloth)संतापलेल्या आई-वडिलांनी तातडीने परळी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून त्या दोन नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गु.र.न 125/2026 कलम 64,127(2),351(2),352,3(5), भारतीय न्याय संहिता सहकलम 4,17, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केला. यामधील दोन्ही आरोपी फरार झाले असून त्या नराधमांचा तपास उपविभाग अंबाजोगाई पिंक पथक आणि स.पो.नी संतोष जाधववर हे करत आहेत.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?