आयपीएल 2026 चा सीजन सुरु व्हायला आता काही दिवसच उरलेत.(clash) 28 मार्च रोजी या लीगचा 19 वा सीजन चालू होईल. या सीजनसाठी सर्वच टीम्सनी जोरदार तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने सुरुवातीच्या सामन्यांचं शेड्यूलही जारी केलय. या दरम्यान पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून एक हैराण करणारी बातमी समोर आलीय. सीजन सुरु होण्याआधी मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याने माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिलाय असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. आता यावर मुंबई इंडियन्सची प्रतिक्रिया आली आहे.

आयपीएल 2026 आधी मुंबई इंडियन्सबद्दल एक अफवा पसरली आहे. कॅप्टन हार्दिक पंड्याने माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये (clash)एका युजरने असा दावा केलेला की, “हार्दिकने टीम मॅनेजमेंटला स्पष्टपणे सांगितलय की, यावेळी जर रोहित शर्माने धावा केल्या नाहीत, तर सहन करणार नाही” पोस्टमधील दाव्यानुसार “मॅनेजमेंट मागच्या 10-12 वर्षातील रोहितच्या प्रदर्शनावर नाराज आहे. कारण तो प्रत्येक सीजनमध्ये 200-300 धावाच करु शकतो. ते सुद्धा 120 च्या स्ट्राइक रेटने. पण टीममधील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे”

सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने पसरली आणि क्रिकेट फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनली. रोहित शर्माचा फलंदाजीचा फॉर्म मागच्या काही काळापासून चिंतेचा विषय आहे. IPL 2013 च्या सीजननंतर त्याने कुठल्याही सीजनमध्ये 500 धावा केलेल्या नाहीत. मागच्या सीजनमध्ये त्याने 15 सामन्यात 418 धावा केल्या आहेत. (clash)मुंबई इंडियन्सने ही पोस्ट फेटाळून लावली आहे. टीमने अधिकृत सोशल मिडिया हँडलवर फक्त दोन शब्दात उत्तर दिलं, ‘काही ही’. त्यांनी हार्दिक पंड्याचा एक मजेदार GIF पोस्ट केला. त्यावरुन सोशल मीडियाची ही पोस्ट तथ्यहीन असल्याचं स्पष्ट झालं.

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या दोघे मुंबई इंडियन्सचं प्रमुख अंग आहेत. हार्दिक 2024 पासून कॅप्टन आहे. रोहितने यशस्वीरित्या मुंबई इंडियन्सच कर्णधारपद संभाळलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळी आयपीएल ट्रॉफी जिंकली. दोघांनी मिळून टीमला पुन्हा एकदा विजेता बनवावं अशी फॅन्सची इच्छा आहे. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स 29 मार्चला आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. त्यांचा पहिला सामना KKR विरुद्ध होणार आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *