व्हॉट्सअॅपमध्ये आलेले पॅरेंटल कंट्रोल हे नवीन फीचर १३ वर्षांखालील (Parental) मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या फीचरमुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या चॅटिंगवर पूर्णपणे लक्ष ठेवता येईल. विशेष म्हणजे मुलांचे स्वतंत्र खाते असले तरी ते पालकांच्या मुख्य खात्याशी जोडलेले असेल, ज्यामुळे मुलांच्या संवादावर पालकांचे नियंत्रण राहण्यास मदत होईल.या नवीन बदलामुळे मुले कोणाशी बोलत आहेत आणि कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत, हे पालकांना रिअल टाइममध्ये पाहता येणार आहे. पालकांना मुलांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नवीन व्यक्ती जोडण्याचे किंवा अनोळखी व्यक्तींना ब्लॉक करण्याचे अधिकार असतील. यामुळे मुले सायबर गुन्हेगारी किंवा अनोळखी व्यक्तींच्या जाळ्यात अडकण्यापासून सुरक्षित राहतील.

डिजिटल शिस्त लावण्यासाठी व्हॉट्सअॅपने यामध्ये वेळेचे बंधन (Parental)घालण्याची सुविधाही दिली आहे. मुले दिवसातून किती वेळ व्हॉट्सअॅप वापरू शकतात, हे पालक स्वतः ठरवू शकतील. ठराविक वेळेनंतर अॅप आपोआप लॉक होईल, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासावर किंवा झोपेवर परिणाम होणार नाही आणि त्यांना तंत्रज्ञानाची योग्य सवय लागेल.
या फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या गोपनीयतेची काळजी घेऊन दिलेली सुरक्षितता. (Parental)पालकांना मुलांचे चॅट्स पाहता येत असले, तरी व्हॉट्सअॅपचे एंड टू एंड एन्क्रिप्शन कायम राहते. यामुळे सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळते ज्यामुळे पालकांची चिंता दूर होऊन मुलांचा डिजिटल प्रवास सुखकर होतो.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?