युद्ध सुरु असताना इराणने भारताच्या तेल टँकर्सना होर्मुज स्ट्रेट पार करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पोटात दुखत असून त्यांनी धक्कादायक आरोप केले. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

इराणने युद्ध चालू असताना होर्मुज स्ट्रेटमध्ये अशा पद्धतीची नाकेबंदी केलीय की, ज्याने अनेक देशात तेल आणि गॅस संकट निर्माण झालय. जहाजांची वाहतूक थांबल्याने भारतासह अनेक देशांवर त्याचा परिणाम दिसून आलाय. भारताने या परिस्थितीत चर्चेचा मार्ग निवडलाय. इराणने भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना होर्मुझ पार करण्याची परवानगी दिली आहे. भारतीय जहाजांना परवानगी मिळाल्यानंतर अनके रिपोर्ट्समध्ये भारताने इराण सोबत डील केल्याचा दावा करण्यात येतोय. अमेरिका सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Amidst) यांनी भारताने इराणसोबत कोणताही व्यापक किंवा ब्लँकेट करार केलेला नाही हे स्पष्ट केलय. ते एवढच म्हणाले की, जहाजांच्या वाहतुकीसाठी वेगळी चर्चा सुरु आहे.
या महत्वाच्या जलमार्गावरुन भारतीय जहाजांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावं, यासाठी इराणसोबत चर्चा सुरु आहे असं रविवारी इंटरव्यूमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले. त्याचे परिणाम आपण पाहतोय असं त्यांनी सांगितलं. शनिवारी या स्ट्रेटमधून भारताचा झेंडा असलेले दोन टँकर आले. कूटनितीने काय साध्य होतं, त्याचं हे उदहारण आहे असं ते म्हणाले. दोन तेल टँकर्सना होर्मुज स्ट्रेट मधून येता यावं यासाठी भारताने इराणसोबत करार केलाय असा एनबीसी सोबत बोलताना अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांनी दावा केला. अमेरिकेने एकप्रकारे जळफळाटीतून हा आरोपच केला.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “मी त्यांच्याशी चर्चा करतोय. त्या चर्चेचे काही परिणाम आपण पाहतोय. ही प्रक्रिया सुरु आहे. यातून रिझल्ट मिळत असेल तर निश्चित मी यावर पुढेही लक्ष देईन” “भारताला हॉर्मुझ स्ट्रेट पार करण्याची परवानगी दिली. त्या बदल्यात इराणला काहीही मिळालेलं नाही” हे जयशंकर यांनी स्पष्ट केलं. (Amidst) दोन्ही देशांमधील व्यवहारासाठी त्यांनी इतिहासाचा हवाला दिला. ते म्हणाले की, माझ्या चर्चेचा हाच आधार होता.
“भारत आणि इराणमध्ये जुने संबंध आहेत. विद्यमान स्थितीत निर्माण झालेला संघर्ष दुर्देवी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आमची दुसरी जहाजं सुद्धा तिथे आहेत. एकाबाजूला स्वागत करण्यासारखी स्थिती आहे, तर दुसरीकडे चर्चा सुरु आहेत” असं जयशंकर म्हणाले.
भारतीय झेंडा असलेला क्रूड ऑईलचा टँकर जाग लाडकी भारतात येण्यासाठी फुजैरा येथून रविवारी रवाना झाला. (Amidst) याआधी दोन एलपीजी टँकर शिवालिक आणि नंदा देवी यांनी शनिवारी हॉर्मुज स्ट्रेट पार केलं. शिवालिक कच्छच्या खाडीत पोहोचलं आहे. मुंद्रा बंदरात LPG टर्मिनलवर हे जहाज थांबेल.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज