यंदा 19 मार्च 2026 रोजी गुढी पाजवा असून हिंदू नववर्षाची सुरूवात होत आहे. देवांचा गुरु बृहस्पती या वर्षाचा राजा असेल. या मंगलदिनी कडुलिंब खाण्याची अनोखी परंपरा आहे, जे आपल्या जीवनातील चढ-उतार स्वीकारण्याचे प्रतीक मानलं जाते. तसेच, वसंत ऋतूतील बदलत्या हवामानात आरोग्यासाठीही कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे संसर्ग व ॲलर्जीपासून संरक्षण मिळते.

हिंदू धर्मात नवं संवत्सर म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरूवात खूप खास, महत्वाची मानली जाते. दर वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला तिथीने हिंदू नव वर्ष सुरू होतं. तोच दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा हा गुरूवारी, 19 मार्च रोजी येणार आहे. (Gudi Padwa) याच दिवसापासून विक्रम संवत्सर 2083 सुरू होणार आहे. आणि या वर्षी गुढी पाडवा गुरूवारी येत असल्यानेदेवांचा गुरु बृहस्पति हा या नवीन वर्षाचा राजा मानला जाईल.

ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षं ज्या दिवशी येतं, तो दिवस ज्या ग्रहाचा असतो, तो ग्रह त्याचा राजा मानला जातो. या नवीन वर्षाचा अधिपती मंगळ असेल. महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. लोक भल्या पहाटे उठून स्नान करतात आणि गुढी उभारून, तिची पूजा करून, नैवेद्य दाखवतात. (Gudi Padwa) मात्र याच दिवशी अनेक ठिकाणी कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का. गुढी पाडव्याच्या साची सुरूवता कडू अशी पानं खाऊ का करतात, त्या मागे काय शास्त्र् आहे ?

कडुनिंबाची पानं खाण्याची परंपराभारतातील अनेक भागात हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. विशेषतः महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात उगादीच्या वेळी लोक या दिवशी कडुलिंबाची पानं आवर्जून खातात. अनेक ठिकाणी कडुलिंबाची पानं ही गूळ, चिंच किंवा कैरीसोबतही मिसळून खाल्ली जातात. धार्मिक मान्यतेनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंबाची पाने खाणं म्हणजे, जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचा स्वीकार करण, त्यांना सामरो जाणं, असं प्रतीक मानलं जातं.

कडूनिंबाची पाने आपण स्वतःलाच एका प्रकारे संदेश देतो, की येणारं हे नवं वर्ष आनंद-दु:ख, यश आणि आव्हानांनी भरलेलं असू शकतं. आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असलं पाहिजे. (Gudi Padwa) शिवाय, ही परंपरा आरोग्याशी देखील जोडलेली आहे. हिंदू नववर्ष सामान्यतः वसंत ऋतूमध्ये येते, तेव्हा हवामान बदलतं. यावेळी, संसर्ग आणि ॲलर्जीचा धोका वाढतो. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीर शुद्ध होते आणि रोगांपासून संरक्षण होते असं मानलं जातं.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *