सोमवारी सकाळी 16 मार्च 2026 दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Plumes) झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खळबळ उडाली आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा फटका आता थेट जागतिक विमान वाहतुकीच्या महत्त्वाच्या केंद्राला बसला आहे.दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सोमवारी पहाटे विमानतळाच्या परिसरात एका ड्रोनचा आघात झाला. या हल्ल्यामुळे विमानतळाजवळील एका इंधन टाकीला आग लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये विमानतळाच्या आकाशात आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

दुबई सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून (Plumes)आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. दुबईकडे येणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे ‘अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळा’कडे वळवण्यात आली आहेत.एमिरेट्स एअरलाईन्सने प्रवाशांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केले असून, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात त्यांना कानठळ्या बसवणारे महाभयंकर आवाज ऐकू आले. या आवाजांनंतर काही क्षणांतच विमानतळाच्या नजीकच्या भागातून आगीचे महाकाय लोळ आणि काळा धूर आकाशाच्या दिशेने झेपावताना दिसला. या घटनेची माहिती मिळताच दुबई नागरी संरक्षण दल आणि इतर आपत्कालीन बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये या आगीचे रौद्र रूप आणि आकाशात उडणाऱ्या ज्वाळा स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.

हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य (Plumes) परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. इराणने यापूर्वीच दुबई आणि कतारमधील काही भागांतून रहिवाशांना बाहेर पडण्याचा इशारा दिला होता, कारण तिथे अमेरिकन लष्करी मालमत्ता असण्याची शक्यता होती. अहवालानुसार, 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या या संघर्षात इराणने आतापर्यंत यूएईवर 1,800 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत.या हल्ल्यामुळे जागतिक व्यापार आणि पर्यटन केंद्र म्हणून दुबईच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. इराण-अमेरिका युद्धाचा हा विळखा आता आखाती देशांमधील नागरी पायाभूत सुविधांनाही लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *