सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. (gold)टॅरिफ दर आणि जागतिक स्तरावरील घडामोडी यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेकजण गणपती बाप्पासाठी दागिने करतात. मात्र गणेशोत्वसाआधीच सोनं महागले आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं एक लाखांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून 93,800 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 76,750 रुपयांवर पोहोचले आहे.

मागील आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 0.22 टक्क्यांने वाढले आहे तर 10 दिवसांपूर्वी सोनं 3.06 टक्क्यांनी वाढलं आहे.(gold) येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?(gold)

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 93,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,330 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,750 रुपये
ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,380 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,233 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,675 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 75,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,864 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61,400 रुपये

हेही वाचा :

6 ऑगस्ट बुधवारी गजलक्ष्मी योग; या राशींचे लोक होणार धनवान

संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान: १५ ऑगस्ट आणि भगव्या झेंड्यावरील

पालकांनो लक्ष द्या! नवजात बाळाची काळजी घेताना ‘या’ 4 चुका करू नका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *