जबरदस्ती आणि बेकायदेशीर पद्धतीने धर्मांतर करण्यास प्रतिबंध घालणारे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक वादळी चर्चेनंतर विधानसभेत मंजूर झालं आहे. या विधेयकाचा नेमका हेतू, त्यात असणाऱ्या शिक्षेच्या तरतुदी यासह संपूर्ण माहिती जाणून घ्या.

जबरदस्ती आणि बेकायदेशीर पद्धतीने धर्मांतर करण्यास प्रतिबंध घालणारे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक वादळी चर्चेनंतर विधानसभेत मंजूर झालं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. मात्र महाविकास आघाडीतील त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधेयकाला कडाडून विरोध केला. माकप आणि समाजवादी पक्षानेही विधेयकाला विरोध दर्शवला. दरम्यान या विधेयकामागे नेमका हेतू काय आहे? त्यात शिक्षेसंदर्भात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत हे जाणून घ्या.
राज्यात अनेक वेळा धर्मांतरणाच्या मुद्यावरून, वेगवेगळ्या धर्मातील लग्नावरुन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी जे प्रचलित कायदे आहेत, IPC आणि इतर कायदे आहेत त्यात स्पष्ट तरतुदी नाहीत. उदारहणादाखल फसवणुकीचा अवलंब करतो. पण ठराविक या विषयासाठी तरतूद असेल तर अडचण निर्माण होत नाही. दोन बाजूचे लोक समोर येणं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं हे होऊ नये यासाठी सुस्पष्टता आणण्यासाठी विधेयक आणण्यात आलं आहे अशी माहिती चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बळजबरी, फसवणूक, बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण देण्यासाठी हे विधेयक आहे. कोणी धर्मांतर करु नये यासाठी हे विधेयक नाही. धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण कऱण्यासाठी आहे. बेकायदेशीरणे धर्मांतराला हे प्रतिबंधित करतं. आमिष, जबरदस्ती, फसवणूक, बळजबरी, लबाडी किंवा अल्पवयीन धर्मांतर बेकायदेशीर असणार आहे.(Maharashtra) या कायद्याचे उल्लंघन करून जर धर्मांतर केलं असेल तर संबंधित व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र ठरणार आहे. धर्मांतरण बळजबरीने होऊ नये यासाठी 60 दिवसांची नोटीस अनिवार्य आहे. धर्मातर केल्यानंतर 21 दिवसांत जाहीर करायचं आहे. प्रशासकीय नोंदीसाठी ते गरजेचं आहे. हे विधेयक सर्व धर्मांसाठी लागू असून, कोणत्याही व्यक्तीचा धर्मांतरणाचा हक्का हिरावून घेतलेला नाही असं चर्चेदरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं.
धर्मांतरण करण्याचा हेतू असणाऱ्या व्यक्तीने नोटीस द्यायची आहे. आणि सक्षम प्राधिकरणाने स्वेच्छेने होत असल्याची खात्री करायची आहे. पण तरतुदीचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यास कारवाई केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्याची नोंद होईल. यानंतर कोणतीही कारवाई करता येणार नाही,” असं त्यांनी सांगितलं.
जर एखाद्याच्या व्यक्तीचे बळजबरीने धर्मांतर झाले असेल तर तक्रार देण्याचे अधिकार आई, वडील, भाऊ, बहीण अथवा त्या व्यक्तीशी रक्ताचे, वैवाहिक, दत्तक नाते असलेल्या व्यक्तीला तक्रार करण्याचे अधिकार असतील. किंवा संशय असल्यास पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे अधिकार आहेत.(Maharashtra) अपऱाध घडला असेल तर 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड आहे. मनोरुग्ण किंवा अनुसूचित जाती, जमातीमधील व्यक्ती असल्यास 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. दोष सिद्ध होण्यापूर्वी दुसरा गुन्हा केला तर 10 वर्ष कारावास दिला जाईल. संस्था जबाबदार आढळली तर कारवाईचे अधिकार शासनाला असेल.
अनेकदा बेकायदेशीर धर्मांतरण होऊन लग्न होतं. लग्न झाल्यानंतर विच्छेद होतो. पण बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी केलेला कोणताही विवाह न्यायालयाद्वारे शून्यवत व निरर्थक असल्याचं घोषित केलं जाईल. न्यायालयाच्या माध्यमातून हे ठरवलं जाईल. तसंच बेकायदेशीर धर्मांतरणातून बाळ जन्माला आलं असेल तर त्याला कुठल्या जातीचं धर्माचं मानण्यात यावं. तर बाळाला आईचा धर्म लागू होईल. आई-वडिलांच्या मालमत्तेत उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क बाळाचा कायम असेल. देखभाल खर्चाचा हक्क त्यांच्याकडे असेल, तसंच बाळाचा ताबा आईकडे असेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
संविधानात कलम 21 आणि 25 महत्त्वाचे आहेत. जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला कोणीच पाठिंबा देणार नाही. या देशात धर्मस्वातंत्र्य होतं ना? बुद्धाने धर्म का सोडला? त्यांनी धर्म सोडल्यानंतर भुक्कूंच्या हत्या का झाल्या? धर्मांतराला आमचा विरोध आहे. जर एका मुल- मुलीने लग्न करण्याचं ठरवलं, ज्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. (Maharashtra) आपण त्यांना मारून वेगळे करणार आहोत का? जर मला वाटले की मला माझा धर्म बदलायचे आहे त्यात शासन का येणार? मी सच्चा हिंदू आहे मला बोलायला लाऊ नका असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
धर्म स्वातंत्र्य विधेयकावर काँग्रेस नेते अस्लम शेख यांनीही आपला विरोध दर्शवला. दोन धर्माच्या मुला-मुलीने जर लग्न करण्याचा विचार केला आणि त्यांच्या आई वडिलांनी जर आरोप केला की धर्मांतर केले जात आहे तर काय? धर्मांतर झाले नाही हे आरोपी कसं सिद्ध करणार? याचा देखील विचार केला पाहिजे दोन प्रेम करणाऱ्या लोकांवर अन्याय होणार आहे असं ते म्हणाले.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज