आखाती युद्धाचे चटके भारतातील सर्वसामान्यांना बसत आहेत. (provide)मध्य-पूर्वेतील युद्धाची राज्यातील अनेक उद्योगांना, हॉटेल व्यावसायिक, टपरी चालकांपासून ते सामान्य जनतेला मोठा फटका बसल आहे. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या भल्या पहाटेपासून लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. तर हॉटेल व्यावसायिकांसह घरातही इंडक्श गॅस, विद्युत शेगडी, चूल असे अनेक पर्याय तसेच सौर ऊर्जेवरील काही साधनांचा वापर वाढला आहे. दरम्यान सरकारने एककीडे गॅस तुटवडा नसल्याचा दावा केला असला तरी गॅस एजन्सीसमोरील वाढती गर्दी पाहता गॅसला एक पर्याय समोर केल आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने पर्याय म्हणून केरोसिन, रॉकेल वितरण करण्याचा विचार आहे. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत याविषयीची घोषणा केली आहे.

पूर्वी रॉकेलचा काळाबाजार होत असल्याची सातत्याने ओरड होत होती. (provide)त्यानंतर घरोघरी धूर रहित स्वयंपाकासाठी आणि अवलंबित्व कमी करण्यासाठी रॉकेलचा वापर कमी झाला. पांढरं असो की निळं, कोणतंही रॉकेल लवकर उपलब्ध होत नाही. पण सध्याची इंधन टंचाई लक्षात घेता सरकारने पुन्हा जुनाच पर्याय समोर आणला आहे. एलपीजीला पर्यायी इंधन देण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. पेट्रोल पंपावर केरोसीन वाटप करण्याबाबतपुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचे चित्र अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. गॅस घेण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दरम्यान, यांच्या वतीने गॅस एजन्सींना केवळ OTP प्रणालीद्वारे सिलेंडर वितरण करण्याचे तसेच 96 तासांच्या आत ग्राहकांना गॅस पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देण्यात आले आहेत.

यासोबतच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट (provide)गॅस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येत असून अनेक ठिकाणी नागरिकांना काळ्या बाजारातून तब्बल 400 रुपयांपर्यंत अधिक दराने गॅस घ्यावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नसल्याने नागरिकांना एजन्सीसमोर तासन्तास भर उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे.गॅस दरवाढ आणि गॅस तुटवडा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारला गॅस तुटवड्याबाबत जाब विचारण्यात आला आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *