MS Dhoni पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण आहे त्याचा (famous jersey) प्रसिद्ध जर्सी क्रमांक. भारताचा आणि Chennai Super Kings चा माजी कर्णधार म्हटलं की चाहत्यांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम ७ क्रमांकाची जर्सी येते. अनेक वर्षांपासून हा क्रमांक धोनीची ओळख बनला आहे. मात्र आता त्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे मोठी चर्चा रंगली आहे.

धोनीने फेसबुकवर शेअर केलेल्या (famous jersey) व्हिडिओमध्ये त्याची ७ क्रमांकाची जर्सी काढून त्याजागी ८ क्रमांकाची जर्सी ठेवताना दिसते. या व्हिडिओसोबत त्याने लिहिलेल्या कॅप्शनने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. “काही क्रमांक कायम तुमच्यासोबत राहतात… ७ त्यापैकीच एक होता. पण आता मी ८ निवडला आहे, कारण लवकरच कळेल,” असे त्याने म्हटले आहे.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (famous jersey) काही चाहत्यांनी याचा संबंध थेट Ravindra Jadeja शी जोडला आहे. कारण जडेजा हा ८ क्रमांकाची जर्सी घालतो आणि अलीकडेच त्याच्या संघातील बदलाच्या चर्चांमुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही जणांना ही केवळ एखाद्या जाहिरातीची रणनीती वाटत आहे, कारण याआधीही धोनीने अशा प्रकारच्या गूढ पोस्ट शेअर केल्या आहेत.

दरम्यान, Sanju Samson च्या संभाव्य भूमिकेबाबतही (famous jersey) चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याच्याकडे येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्याचा कर्णधार Ruturaj Gaikwad याच्यावर फ्रँचायझीचा विश्वास कायम आहे, मात्र संघात होणारे बदल पुढील हंगामात महत्त्वाचे ठरू शकतात.

धोनीने २००८ पासून चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना संघाला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. आता त्याच्या कारकिर्दीचा शेवट जवळ आला असल्याची चर्चा असताना, या जर्सी बदलाच्या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *