जर तुम्हाला पोटदुखीचा किंवा अपचनाचा कोणाताही आजार वारंवार होत असेल तर या चार चाचण्या करणे गरजेचे असते. कोणत्या या चार याची माहिती घेऊयात..

अनेक आजार हे पोटाशी संबंधित असतात. त्यामुळे पोटाच्या आरोग्याला महत्व खूप असते. भारतात आहाराची शैली आणि जीवन शैलीत बदल झाल्याने अनेक जणांना पोट आणि पचनाशी संबंधित आजाराने ग्रासलेले आहे. (stomach) अनेकदा पोटदुखी आणि गॅसला किरकोळ समस्या समजून लोक दुर्लक्ष करत असतात. परंतू हे आजार कोणत्याही गंभीर समस्येची सुरुवात असू शकतात.अलिकडेच एका गॅस्ट्रो एक्सपर्टने ४ अशा आवश्यक टेस्ट सांगितल्या आहेत. ज्या सर्वांनी करायला हव्यात. जर या टेस्टचे रिपोर्ट सामान्य आले तर चिंता करण्याची काही गरज नाही. चला या टेस्ट कोणत्या ते पाहूयात.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोटाच्या आरोग्याचा संबंध संपूर्ण शरीराशी असतो. अनेक लोकांना आयबीएस सारख्या समस्याचा सामना करावा लागतो.(stomach) परंतू त्यांना याचे अचून निदान कसे होते याची माहिती नसते. भारतीय लोकांनी या चार टेस्ट करणे महत्वाचे असते. यास तुम्ही ‘4C’ फॉर्म्युला म्हणू शकता. यात सीबीसी सीआरपी कॅलप्रोटेक्टिन आणि सीलिएक सेरोलॉजी यांचा समावेश आहे.
सर्वात पहिली टेस्ट आहे सीबीसी म्हणजे कंप्लिट ब्लड काऊंड. ही टेस्ट शरीरात हीमोग्लोबिन, इन्फेक्शन आणि अन्य महत्वपूर्ण घटकांची माहिती देते. तेच ( सी-रिएक्टिव्ह प्रोटीन ) टेस्ट सांगते की शरीरात कुठे सूज तर नाही. जर सीआरपीची पातळी वाढली तर हा इशारा असतो की शरीराच्या अंतर्गत भागात, विशेष करुन आतड्यात काही प्रॉब्लेम असू शकतात.
कॅलप्रोटेक्टिन आणि सीलिएक सेरोलॉजी तिसरी टेस्ट आहे कॅलप्रोटेक्टिन. ही शरीरातील मैल्याची चाचणी असते.या चाचणी आतड्यांना सूज आली आहे का ? ते कळते. (stomach) जर वारंवार जुलाब आणि पोटातील वेदनेची तक्रार आहे तर ही टेस्ट खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चौथी चाचणी सीलिएक डिसिज सेरोलॉजी. भारतात गव्हापासून एलर्जीचे प्रकार वाढत आहेत. या चाचणीमुळे कळते की तुमचे शरीर ग्लुटेन पचवत आहे की नाही.
IBS आहे हे केव्हा कळते तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या रुग्णाचे वरील चारही चाचण्या नॉर्मल असतील तरीही त्याला पोटात त्रास होत असेल तर त्याला आयबीएस सिंड्रोम म्हटले जाते. आयबीएस हा कोणताही घातक आजार नाही. तो एक फंक्शनल डिसऑर्डर आहे. ज्यास योग्य आहार आणि तणावमुक्त जीवन जगून दूर करता येते.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज