इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा चढ-उतार सुरू झाले आहेत. मध्यपूर्वेतील परिस्थिती अनिश्चित होत असताना समुद्री व्यापार मार्गांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून भारतासारख्या मोठ्या आयातदार देशात स्वतःच्या तेल उत्पादनाकडे नव्याने लक्ष वेधले जात आहे.

भारतामध्ये तेल उत्पादनाचा इतिहास पाहिला तर आसाम हे सर्वात जुने आणि महत्त्वाचे केंद्र मानले जाते. १८८९ मध्ये दिगबोई येथे देशातील पहिली तेल विहीर खोदण्यात आली होती. (Middle) त्यानंतर नाहरकटिया आणि मोरान-हुगरिजान यांसारख्या क्षेत्रांच्या विकासामुळे या राज्याने दीर्घकाळ भारतीय पेट्रोलियम उद्योगात अग्रस्थान टिकवून ठेवले.
सध्याच्या घडीला भूप्रदेशावरील उत्पादनाच्या बाबतीत राजस्थान आघाडीवर असल्याचे चित्र दिसते. थर वाळवंटातील बारमेर खोरे हे क्षेत्र भारतातील सर्वात मोठ्या आणि उत्पादनक्षम तेल साठ्यांपैकी एक मानले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असून आगामी काळात आणखी शेकडो विहिरी विकसित करण्याची योजना आखली जात आहे.
याशिवाय गुजरात हे राज्य अनेक वर्षांपासून तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनात सातत्याने योगदान देत आहे. तर दक्षिणेकडे तामिळनाडू मधील कावेरी खोरे हे क्षेत्रही महत्त्वाचे मानले जाते, जिथे अनेक तेल आणि वायू प्रकल्प कार्यरत आहेत. (Middle) या सर्व भागांमुळे भारताची ऊर्जा गरज काही प्रमाणात पूर्ण होत असली तरी देश अजूनही मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे.
नैसर्गिक संसाधनांच्या मालकीचा प्रश्नही अनेकदा चर्चेत येतो. भारतीय कायद्यांनुसार देशातील जमिनीखाली किंवा समुद्रातील प्रादेशिक क्षेत्रात आढळणाऱ्या पेट्रोलियमसारख्या संसाधनांवर पूर्ण अधिकार केंद्र सरकारकडे असतो. एखाद्या राज्यात किंवा खाजगी जमिनीत तेल सापडले तरी त्यावर स्थानिक जमीनमालक किंवा राज्य सरकारचा थेट हक्क नसतो. उत्खनन, उत्पादन आणि वितरण यासंबंधी सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात.
जागतिक स्तरावर वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी स्वतःचे तेल उत्पादन वाढवणे आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा शोध घेणे ही काळाची गरज ठरत आहे.(Middle) त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रात मोठे धोरणात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर
एकनाथ शिंदेंनंतर आता शिवसेनेचा हा बडा नेता दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण