भारतातील अनेकजण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतात.(Rules) डेबिट आणि क्रेडिटबाबतचे नियम १ एप्रिलपासून बदलणार आहे. यामध्ये विमानतळ लाउंज प्रवेशाच्या नियमात बदल केले आहे. डेबिट आणि कार्ड वर देण्यात येणाऱ्या एअरपोर्ट लाउंज प्रवेशाबाबत काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहे. अनेक बँकांनी त्यांच्या रिवॉर्ड स्ट्रक्चरमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले आहे.

नॅशनल पेमेंट्स ऑफ इंडियाच्या नवीन नियमांनुसार,(Rules) काही कार्डंवर मिळणारी कॉम्प्लिमेंटरी लाउंज एन्ट्री रद्द करण्यात आली आहे. तर काही कार्डांच्या खर्चावर आधारित असणार आहे. याचा लाखो कार्डधारकांवर परिणाम होणार आहे.एनपीसीआयने बँकांना १ एप्रिलपासून रुपे प्लॅटिनम कार्डवर देण्यात येणारे लाउंज प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे कार्डधारक यापुढे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर लाउंज सर्व्हिस वापरु शकत नाही. अनेक बँकांनी ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, पंजाब अँड सिंध बँक, (Rules) ईएलएएफ स्मॉल फायनान्स बँकेनेही याबाबत माहिती दिली आहे. रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डवरील लाउंज बंद केला जाणार आहे. तसेच यासाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर रुपे सिलेक्ट कार्डधारकांना तिमाहीत ५००० रुपये खर्च करणे आवश्यक आहे.नवीन नियमांनुसार कार्डधारकांना एअरटेल मोबाईल, ब्रॉडबँक आणि डीटीएच पेमेंटवर २ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. युटिलिटी बिल पेमेंटवरदेखील १०टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे युजर्सवर याचा परिणाम होणार आहे.

हेही वाचा :

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता

संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूजEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *