बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (comeback)तब्बल आठ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या Zero नंतर ती मुख्य भूमिकेत दिसली नव्हती, त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आता साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सोबत भव्य तेलुगू चित्रपटातून एंट्री करू शकते.

हा चित्रपट दिग्दर्शक Atlee यांच्या (comeback)मोठ्या प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. या बहुचर्चित चित्रपटात दीपिका पादुकोण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे हा प्रोजेक्ट पॅन-इंडिया लेव्हलवर मोठा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट साय-फाय आणि मोठ्या बजेटचा असल्याचं समजत आहे.
अनुष्का या चित्रपटाद्वारे टॉलीवूडमध्ये (comeback) डेब्यू करू शकते, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, अनुष्काच्या कमबॅकची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तिचा आणि अल्लू अर्जुनचा जोडीदार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.