अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण (global energy) संघर्षाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या जलमार्गावर निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे भारतासमोर एलपीजीसह इंधनाचा गंभीर तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (global energy) एलपीजीने भरलेली दोन जहाजे अखेर भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. “जग वसंत” आणि “पाई गॅस” अशी या जहाजांची नावे असून, त्यांनी सोमवारी सकाळी होर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारताकडे प्रवास सुरू केला आहे. या जहाजांना प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी भारताने इराणी अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली होती.या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. नौदलाने इराणच्या सुरक्षा यंत्रणांशी, विशेषतः इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांच्याशी संवाद साधत मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या चर्चांना यश आले आणि जहाजांना सुरक्षितपणे भारताकडे रवाना होण्याची परवानगी मिळाली.

गेल्या काही दिवसांत एलपीजीचा तुटवडा वाढल्यामुळे देशभरात घरगुती गॅस (global energy) सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी सिलिंडर मिळण्यात उशीर होत होता, तर व्यावसायिक गॅसची उपलब्धताही कमी झाली होती. याचा थेट फटका हॉटेल आणि इतर लघुउद्योगांना बसत होता. या पार्श्वभूमीवर आता ही दोन जहाजे भारतात पोहोचल्यास परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, मध्यपूर्वेतील तणाव अजूनही कायम असल्याने भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी मार्ग आणि पुरवठ्याचे पर्याय शोधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू ठेवले आहेत. तरीही, सध्या येणारी ही एलपीजीची खेप देशासाठी मोठा दिलासा मानली जात आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *