प्रयागराज येथे सोमवारी भीषण दुर्घटना घडली असून गद्दोपूरजवळील चंदापूर (horrific tragedy) भागातील एका कोल्ड स्टोरेजची इमारत अचानक कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (horrific tragedy) कोल्ड स्टोरेजमध्ये अचानक कूलिंग चेंबरमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर संपूर्ण इमारत कोसळली. त्या वेळी सुमारे ११० कामगार आत काम करत होते. काहींनी प्रसंगावधान राखत बाहेर पळ काढला, मात्र अनेक जण अडकले. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून पोलीस, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
दरम्यान, कोल्ड स्टोरेजमधून अमोनिया गॅसची गळती सुरू झाल्याने बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या गॅसच्या प्रभावामुळे घटनास्थळाच्या सुमारे १ किलोमीटर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
ही इमारत समाजवादी पक्षाचे माजी आमदार अन्सार अहमद यांच्याशी (horrific tragedy) संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी कोल्ड स्टोरेजच्या व्यवस्थापकाला अटक केली असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. या ठिकाणी काम करणारे बहुतांश मजूर सासाराम येथील असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?