आयपीएल 2026 स्पर्धेच्या तोंडावर Delhi Capitals संघाला मोठा धक्का बसला आहे. (major setback) संघाचा संभाव्य सलामीवीर आणि मॅच विनर मानला जाणारा Ben Duckett याने स्पर्धेतून अचानक माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्पर्धा सुरू होण्यास अवघे चार दिवस उरले असताना घेतलेल्या या निर्णयामुळे संघ व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे.

मागील लिलावात दिल्ली कॅपिटल्सने बेन डकेटला (major setback) त्याच्या मूळ किमतीवर संघात घेतले होते आणि प्लेइंग ११ मध्ये त्याची जागा जवळपास निश्चित मानली जात होती. डावाची मजबूत सुरुवात करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार होती. मात्र ऐनवेळी माघार घेतल्याने संघाला पर्याय शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. विशेषतः समान दर्जाचा सलामीवीर मिळवणे हे आता संघासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
दरम्यान, Board of Control for Cricket in India ने विदेशी खेळाडूंना लागू केलेल्या नव्या नियमांनुसार, लिलावात निवड झाल्यानंतर स्पर्धेपूर्वी माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाते. या नियमानुसार संबंधित खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालण्यात येते. त्यामुळे बेन डकेटला आता 2027 आणि 2028 च्या हंगामातही आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, आणि त्याचा पुढील सहभाग थेट 2029 मध्येच शक्य होईल.
यापूर्वीही अशीच परिस्थिती Harry Brook याच्या बाबतीत निर्माण झाली होती. (major setback) त्यानेही आयपीएल 2025 पूर्वी माघार घेतली होती आणि त्यालाही दोन वर्षांची बंदी सहन करावी लागली. विशेष म्हणजे त्यावेळीही दिल्ली कॅपिटल्सनेच त्याच्यावर मोठी बोली लावली होती. त्यामुळे सलग दोन वेळा इंग्लंडच्या खेळाडूंमुळे फटका बसल्याने फ्रेंचायझी भविष्यात अशा खेळाडूंवर बोली लावताना अधिक सावध भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींमुळे आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या रणनितीवर मोठा परिणाम झाला असून, आता संघ व्यवस्थापन या संकटातून कसा मार्ग काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर