Indian Premier League 2026 च्या 19 व्या हंगामाची उलटी गिनती सुरू (19th season) असताना, सर्व संघ जोरदार तयारीत गुंतले आहेत. 28 मार्चपासून रंगणाऱ्या या स्पर्धेपूर्वी Kolkata Knight Riders च्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. संघातील विस्फोटक फलंदाज Rinku Singh याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

रिंकू सिंगसाठी हा हंगाम खास (19th season) ठरणार आहे, कारण तो आता केवळ फिनिशर म्हणून नव्हे तर नेतृत्व गटाचा भाग म्हणून मैदानात उतरणार आहे. 2018 साली केकेआरकडून पदार्पण करणाऱ्या रिंकूने सुरुवातीच्या काही हंगामांत मर्यादित संधी मिळूनही संयम राखला आणि मेहनतीच्या जोरावर संघात आपली जागा पक्की केली. गेल्या काही हंगामांत त्याने निर्णायक क्षणी खेळी करत स्वतःला एक विश्वासार्ह फिनिशर म्हणून सिद्ध केलं आहे.
आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत रिंकूने 50 पेक्षा अधिक डावांत 1000 धावांचा (19th season) टप्पा पार केला आहे. सुमारे 30 च्या सरासरीसह आणि 145 च्या स्ट्राईक रेटने केलेली फलंदाजी त्याच्या आक्रमक शैलीची साक्ष देते. त्याने अनेकदा दबावाच्या परिस्थितीत संघाला विजय मिळवून देत आपली किंमत सिद्ध केली आहे.मात्र अलीकडचा काळ रिंकूसाठी आव्हानात्मक ठरला आहे. वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंग आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांतील अपेक्षित कामगिरी न होणं, या दोन्ही गोष्टींमुळे त्याच्यावर दबाव आहे. तरीही केकेआर व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास हेच त्याच्यासाठी मोठं बळ ठरणार आहे.
या हंगामात (19th season) संघाची धुरा अनुभवी फलंदाज Ajinkya Rahane याच्या खांद्यावर असणार आहे. रहाणेच्या शांत नेतृत्वशैलीला रिंकूची आक्रमक वृत्ती साथ देणार असल्याने केकेआरचा समतोल अधिक मजबूत दिसत आहे.आता सर्वांच्या नजरा रिंकू सिंगवर असतील—उपकर्णधार म्हणून तो संघाला किती प्रभावीपणे साथ देतो आणि फलंदाजीतून स्वतःची ओळख पुन्हा एकदा ठळक करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा :
दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर