कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील मिरगाव च्या (file)अशोक खरात याची महाराष्ट्र एपसटीन फाईल, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिलेला राजीनामा, सातारा जिल्हा परिषद परिसरात मंत्र्यांनीच घातलेला राडा, एकनाथ शिंदे यांचे”ऑपरेशन टायगर”, भारतीय जनता पक्षाचे”ऑपरेशन लोटस”, कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात महायुतीच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची केलेली कृती, बघून घेण्याची दिलेली धमकी या घडलेल्या काही घटनांमधून महाराष्ट्रातील सदोष राजकीय व्यवस्थेचे विदारक दर्शन घडते.

अशा व्यवस्थेच्या माध्यमातून होत (file)असलेले लोकशाहीचे वस्त्रहरण अतिशय चिंताजनक आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव हे गाव अचानक चर्चेत आले. तेथील ईशानेश्वर मंदिर परिसरात”शिवनिका”नावाचे अध्यात्मिक संस्थान आहे. आणि या संस्थानचा प्रमुख अशोक एकनाथ खरात हा भोंदू बाबा आहे. आणि आता त्याचा विकृत आणि भेसुर चेहरा महाराष्ट्राच्या समोर आला आहे. आणि त्याची तुलना न्यूयॉर्कच्या तुरुंगात संशयास्पद स्थितीत मरण पावलेल्या एपसटीनशी केली जाते. या खरात फाईलने अनेकांची झोप उडवली आहे.

कारण या खरात च्या लैंगिक (file) विकृतीच्या कथा ऐकून किळस यावी. एकनाथ शिंदे, दीपक केसरकर वगैरे मंत्री खरात च्या दरबारात हजर होतात. त्याचे फोटो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर असतात. महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर ह्या तर खरातचे पाय धुतात. पाद्य पूजा करतात. हा खरात बाबा त्याचा अंधश्रद्धेचा बाजार बहरण्यासाठी गैरफायदा घेतो. त्याची दुकानदारी वाढते. कोणत्याही समस्यांवर रामबाण इलाज अशी हवा त्याच्याकडून तयार केली जाते. त्याच्या दरबारात महिलांना प्राधान्य असते. मग त्यातून तो आपल्या कार्यालयाचे रूपांतर लैंगिक छळ छावणीत करतो.

अशोक खरात सारखी घायपात (file)वाढत जाण्याला इथली राजकीय व्यवस्था कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. रूपाली चाकणकर यांचे त्या पाद्यपूजा करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये आल्यानंतर त्यांना त्यांच्या मंत्र्याचा दर्जा असलेल्या पदाचा राजीनामा देण्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता. आता किमान महिनाभर तरी खरात फाईल गाजत राहणार आहे, वाजत राहणार आहे. आता त्याचा माज उतरवण्याची खरी जबाबदारी एस आय टी च्या अधिकाऱ्यांवर आहे.

शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ (file) शिंदे यांना चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल दोन तासांचा आपला अमूल्य वेळ देतात. आणि नंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर ची चर्चा मीडियात सुरू होते. पंतप्रधान बरोबर दोन तास चालवलेल्या चर्चेत महाराष्ट्रातील हवामानाची चर्चा तर नक्कीच झालेली नाही. राजकीय हवामानावर मात्र चर्चा झालेली आहे. पंतप्रधान हे आपल्या बिझी शेड्युल मधून शिंदे यांच्यासाठी दोन तास देतात याचा अर्थ काय होतो? एन. डी. ए. ते संख्याबळ वाढवण्यावर या दोघांत चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे. ही सुद्धा एक प्रकारची सदस्य राजकीय व्यवस्था आहे असे म्हणावे लागेल.

सातारा जिल्हा परिषदेतअध्यक्ष (file)आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्येच हात घाई होते. आणि त्यातून पुरेसे संख्याबळ नसतानाही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यासाठी दोन सदस्यांना एका गुन्ह्यात ते आरोपी असल्यामुळे पोलिसांकडून पकडून नेले जाते, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडले जातात आणि सातारा जिल्हा परिषदेत ऑपरेशन लोटस सक्सेस होते. या सर्व गदारोळात पोलीस हे पालकमंत्र्यांनाच ओढून नेतात. त्यांना दुखापत केली जाते. हे सगळे धक्कादायक आहे. त्यातून राजकीय व्यवस्थेचे वाभाडे निघते.

कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात सर्वसाधारण सभेच्या वेळी महायुतीचे दोन जेष्ठ नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जातात. एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. सभागृहाच्या बाहेर येण्याचे एकमेकांना आव्हान देतात. घडलेल्या या प्रकाराची मंत्री हसनमुश्रीफ हे गांभीर्याने दखल घेतात आणि या दोघांचीही शाहू खासबाग मैदानात कुस्ती लावून दिली जाईल अशी घोषणा करतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास यांच्यात घडलेला हा दुसरा प्रसंग आहे. महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या दोघांमध्ये हाणामारी झाली नाही तर नवल. हा सुद्धा सदोष राजकीय व्यवस्थेचा एक भाग आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *