घरगुती गॅस सिलिंडरची (cylinder) प्रतीक्षा करत असलेल्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अनेक ठिकाणी २० ते २५ दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र आता ग्राहकांना थेट (cylinder)तक्रार नोंदवण्यासाठी विशेष हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.गॅस एजन्सीकडून वेळेत सेवा न मिळाल्यास ग्राहकांनी संबंधित अधिकृत क्रमांकावर कॉल करून किंवा ऑनलाइन माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ दखल घेतली जाईल आणि वितरण प्रक्रियेला गती दिली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या मागणीमुळे (cylinder) काही भागात वितरणात अडथळे येत असल्याचे कारण पुढे येत असले, तरी ग्राहकांना वेळेत सेवा देणे ही एजन्सीची जबाबदारी असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी चिंता न करता आपल्या समस्येची तक्रार नोंदवावी आणि योग्य ती मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.