मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत अखेरीस 2012 साली हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर मु्ंबईला गेल्या 14 हंगामात आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता. मात्र अखेर भारताने ही प्रतिक्षा संपवली आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिला सामना 28 मार्चला खेळवण्यात आला. सलामीच्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी गतविजेत्या आरसीबीने सनरायजर्स हैदराबादला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. विराट कोहली सर्वाधिक धावा करुन आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. (Mumbai Indians) त्यानंतर या हंगामातील दुसऱ्या सामन्यात रविवारी 29 मार्चला स्पर्धेतील सर्वात यशस्वी पहिली टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. विराटप्रमाणे रोहित शर्मा याने रायन रिकेल्टन याच्यासह मॅचविनिंग खेळी करुन मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने या विजयासह 14 वर्षांची प्रतिक्षा संपवली.

उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मुंबईसमोर आपल्याच घरच्या मैदानात आणि पहिल्याच सामन्यात सर्वात मोठं आव्हान होतं. मुंबईने ही संधी गमावली तर पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागणार होती. (Mumbai Indians) तसेच मुंबई गेल्या 13 हंगामांपासून सातत्याने अपयशी ठरत होती. त्यामुळे मुंबई 29 मार्चला यशस्वी ठरणार का? याकडे साऱ्या पलटणचं लक्ष लागून होतं. मात्र यंदा मुंबईने चाहत्यांची निराशा केली नाही.मुंबईने या विजयासह 14 वर्षांची दीर्घ प्रतिक्षा संपवली. मुंबईने 14 वर्षानंतर आयपीएलच्या हंगामातील आपला सलामीचा सामना जिंकला. मुंबईने अखेरीस 2012 साली स्पर्धेत आपला पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर मुंबई 14 वर्षांनंतर आज 29 मार्च 2026 रोजी विजयी सलामी दिली.

केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे केकेआरला आपल्या पहिल्याच सामन्यात 220 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र प्रत्युत्तरात मुंबईने हे आव्हान 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 224 धावा केल्या. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. रायनने 81 तर रोहितने 78 धावा केल्या. तर इतरांनी आपलं योगदान दिलं. (Mumbai Indians) दरम्यान मुंबई या मोसमातील आपला दुसरा सामना हा आता 4 एप्रिलला खेळणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात अक्षर पटेल याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे.

हेही वाचा :

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *