उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची(Saharanpur) धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा मुलीच्या सख्ख्या मावशीचा नवरा असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव टिपू असे आहे. २३ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टिपूने बायकोच्या बहिणीच्या १५ वर्षीय मुलीला घरातून खोट सांगून घेऊन गेला. पीडित मुलगी देखील विश्वास ठेवून टिपूसोबत घराबाहेर पडली. (Saharanpur) त्यानंतर टिपूने निर्जनस्थळी नेवून तिच्यावर क्रूरपणे बलात्कार केला. पीडितेने नकार दिल्यानंतर सुद्धा नराधम आरोपी थांबला नाही.


दरम्यान मुलगी घरी सांगेल या भीतीपोटी नराधमाने तिच्यावर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुलीचा मागोवा घेतला. पोलिसांना तपासादरम्यान मुलीचा मृतदेह एका झुडपात नको त्या अवस्थेत आढळला.पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता हे कृत्य पीडितेच्या मावशीच्या नवऱ्याने केल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपी टिपूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Saharanpur) तसेच पोलिसांनी त्याला अटक करून पुढील चौकशी करत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *