बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक आणि विचित्र घटना उघडकीस (electricity tower) आली आहे. हाय व्होल्टेज वीज टॉवरवर चढून तार चोरी करण्याचा प्रयत्न दोन तरुणांच्या जीवावर बेतला. या घटनेनंतर त्यांच्या साथीदारांनी अपघाताचा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर सत्य समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, (electricity tower) अविनाश पाटोळे आणि आकाश आडे हे आपल्या इतर साथीदारांसह पुण्याहून केज तालुक्यात आले होते. नांदूर घाट परिसरातील एका हाय व्होल्टेज टॉवरवर त्यांची नजर गेल्यानंतर त्यांनी तार चोरी करण्याचा कट रचला. नियोजनाप्रमाणे अविनाश पाटोळे आणि आकाश आडे टॉवरवर चढले, तर इतर साथीदार खाली थांबले होते. मात्र, टॉवरवर चढत असतानाच अचानक तोल जाऊन किंवा संरचनेत बिघाड झाल्याने टॉवर कोसळला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी घाबरून मृतदेह कारमध्ये टाकले आणि परभणीकडे निघाले. तिथे जाऊन त्यांनी मृतदेह गाडीतच सोडून पळ काढला.

यानंतर गाडी चालकाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ॲम्बुलन्सच्या मदतीने (electricity tower) दोघांचे मृतदेह रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि अपघाताचा बनाव फसला. घटनेची माहिती मिळताच परभणी आणि केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरीच्या उद्देशाने जीव धोक्यात घालणाऱ्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा :

कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

चारकोपमध्ये सिलिंडर न मिळाल्याने राडा, तर कुठे थेट पेट्रोलची चोरी, इंधन तुटवड्यामुळे नेमकं काय घडतंय?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *