जोतिबा चैत्र यात्रा जोतिबा मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. पासून यात्रेला सुरुवात झाली असून राज्यभरातून तसेच सीमाभागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

मुख्य यात्रा दिवस बुधवार असला तरी पहाटेपासूनच डोंगरावर भक्तांची वर्दळ वाढू लागली. बेळगाव सीमाभागातून आलेले भाविक गायमुख तलाव मार्गे दक्षिण दरवाजातून मंदिरात दाखल झाले.(Jotiba Chaitra) तसेच मधील अनेक भक्तांनी सात दिवसांची पायपीट करत बैलगाड्यांसह डोंगर गाठला. बालेघाट, बीड, लातूर आणि इतर भागांतील भाविकांनीही मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.
डोंगरावर पोहोचलेल्या भाविकांचे ग्रामस्थ, पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मंदिर परिसरात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत भक्तांनी श्रद्धा व्यक्त केली.यात्रेदरम्यान अनेक भाविकांनी डोंगरावर तात्पुरत्या स्वरूपात मुक्कामाची व्यवस्था केली आहे.(Jotiba Chaitra) काहींनी पाण्याच्या टाक्यांजवळ तर काहींनी रस्त्याकडेला बैलगाड्यांच्या साहाय्याने आसरा घेतला आहे. सोलापूर, आंबेजोगाई, परळी, तुळजापूर, नंदुरबार या भागांतून आलेले भाविक सासनकाठी घेऊन यात्रेत सहभागी झाले आहेत. कामदा एकादशीच्या निमित्ताने दुपारी जोतिबा देवाची विठ्ठल रूपातील महापूजा संपन्न झाली.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर व परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले आहे. (Jotiba Chaitra) तसेच यात्रेच्या काळात काही दिवस अवजड वाहनांना डोंगरावर बंदी घालण्यात आली आहे.यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. स्थानिक अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि ग्रामविकास यंत्रणा सतत देखरेख करत असून भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
हेही वाचा :
उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,