पुण्यातील कोथरूड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात देवदर्शनाच्या (shocking case) निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेने पुरुषाला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून नंतर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.

गौरी प्रल्हाद वाजंळे (वय ४२, रा. वनाज, पुणे) असे अटकेतील (shocking case) महिलेचे नाव असून ती स्वतःला वकील असल्याचे भासवत होती. कोथरूड पोलिस ठाणे येथे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ४७ वर्षीय विवाहित व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये तुळजापूर येथे देवदर्शनावेळी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने विश्वास संपादन करून तक्रारदाराला ‘भाऊ’ मानत असल्याचे भासवले. मात्र पुढे त्याच ओळखीचा गैरफायदा घेत तिने त्याला जबरदस्तीने फिरण्यास व शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपी महिलेने तक्रारदाराला पुन्हा (shocking case) कोथरूडमध्ये बोलावून लग्नाचा दबाव टाकला. तसेच दोन लाख रुपये न दिल्यास खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. “मी अशा प्रकारे अनेकांना फसवले आहे, लोक भीतीपोटी पैसे देतात,” असे सांगून तिने तक्रारदाराला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, या महिलेविरुद्ध राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी न्यायालयाने तिला ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक करिश्मा शेख करत असून, आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून