महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. (media) नागपुरात एका तरुणाने १३ वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे हा तरुण मुलीला शाळेला दांडी मारायला लावून तिला हॉटेलमध्येमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करायचा. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये संताप उफाळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव करण केशी असे आहे, (media)तर पीडितेचे नाव मानसी बदलेलं नाव असे आहे. करण आणि मानसीची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. करण आणि मानसीला तिच्या शाळेजवळ यायचा आणि तिला शाळेत जाऊ नको सांगून तिला हॉटेलवर न्यायचा. हॉटेलवर नेवून तिच्यावर बलात्कार करायचा.गेले काही दिवस ही अत्याचाराची मालिका पिडीतेसोबत सुरूच होती. २७ मार्च रोजी देखील मानसी आणि करण शाळेजवळ भेटले. करणने तिला नेहमीप्रमाणे शाळेत जाऊ नको म्हणत शाळेच्या गेटवरून आरोपीने मुलीला गाडीवर बसवून फ्रेंड्स कॉलनीतील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे नेऊन मुलीने विरोध केल्यावरही तिच्यावर अत्याचार केला.
शाळेत मुलगी वारंवार गैरहजर असल्याबाबत शाळेतून पालकांना (media)शिक्षकांनी संपर्क केला. त्यानंतर पालकांनी मुलीला याबाबत विचारल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. पालकांनी या प्रकरणात तातडीने पाऊल उचलत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. पालकांच्या तक्रारीवरून तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक