केंद्र सरकारने डिजिटल जगातील बड्या खेळाडूंवर फास आवळला आहे.(Facebook)इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021, IT Rules 2021 मध्ये आणखी नवीन आणि कडक नियम जोडले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना मोठा दणका बसला आहे. युझर्स आणि कंटेंट यादरम्यान दलाल म्हणून काम करणे या प्लॅटफॉर्मला भोवणार आहे. सरकारच्या नवीन नियमांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, टेलिग्रामसह गुगल आणि युट्यूबचे धाबे दणाणले आहेत. या कंपन्यांच्या मनमानीला चाप लागणार आहे.

युझर्स आणि कंटेंट यांच्या दरम्यान अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Facebook) हे मध्यस्थाची भूमिका निभावतात. याठिकाणी लोक काही पोस्ट करतात आणि समोरील व्यक्तीला ती दिसते. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,टेलिग्राम हे मॅसेजिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर गुगल आणि युट्यूब सारखे सर्च आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्म, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे ई-कॉमर्स, नेटफ्लिक्स, प्राईम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मही या परीघात येणार आहे. त्यांना कडक नियमांचा सामना करावा लागणार आहे.
एक मोठा बदल नियम 8 मध्ये करण्यात आला आहे. आता बातमी आणि (Facebook) ताज्या घडामोडींसंबंधीत कंटेंटवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. आता हे नियम केवळ बातमी प्रकाशित करण्यापर्यंत मर्यादित नसतील. तर त्या सोशल मीडियावर पण करडी नजर असेल जिथे अशा बातम्या अथवा कंटेंट पोस्ट करण्यात येतो. म्हणजे एखादा युझर्स अशी बातमी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,टेलिग्रामवर फॉरवर्ड करत असेल अथवा फेसबुकवर पोस्ट करत असेल तर त्यावर नजर असेल. चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती असेल तर या प्लॅटफॉर्मवरही जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
याचा दुसरा अर्थ आता युझर्सला पण असा कंटेंट फॉरवर्ड करणे (Facebook)अथवा तो शेअर करणे धोक्याचे ठरणार आहे. तुम्ही डोळेझाक करून असा कंटेंट पुढे पाठवत असाल आणि त्याविषयी कुणी तक्रार केली तर मग या नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. अशी कारवाई वाढतील आणि त्याचा मनस्ताप युझर्सला सहन करावा लागेल. त्यामुळे युझर्सला सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंटेंट शेअर करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक