प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो.(wife) बिग बॉस ओटीटीच्या घरात अरमान हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत दाखल झाला होता. अरमानची पहिली पत्नी पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. तर दुसरी पत्नी कृतिका हिला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे सर्वजण एकाच छताखाली आनंदाने राहतात. व्लॉगिंगच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रूपये कमावले आहेत. अत्यंत लग्झरी जीवन जगतात. दहापेक्षाही जास्त लोक त्यांच्या हाताखाली घरातील काम करण्यासाठी आहेत. व्लॉगिंगच्या माध्यमातून ते त्यांचे संपूर्ण आयुष्य दाखवतात.

काही दिवसांपूर्वीच पायल मलिक हिने एक धक्कादायक विधान केले होते, ज्यानंतर तिला लोक खडेबोल सुनावताना दिसले आणि तिला लोकांची हात जोडून माफी देखील मागावी लागली. आता परत एकदा मलिक कुटुंब चांगलंच चर्चेत आलंय. पायल ही चाैथ्यांदा आई बनणार आहे. व्लॉगिंगमध्ये याबद्दल सांगण्यात आले आहे. हेच नाही तर पायल ही प्रेग्नंट असल्याचे सांगताना कृतिका दिसतंय आणि आनंदाने उड्या मारत आहे.अरमान मलिक हा पाचव्यांदा बाप होतोय. अरमान मलिक याने सांगितले की, पायलचा प्रेग्नंसीचा प्रवास हा त्याच्यासाठी अत्यंत खास आहे. (wife)त्याने म्हटले की, काही गोष्टींचे नियोजन केले जाते पण काही गोष्टी आपोआप होतात. असे नाही की, आम्हाला एक बाळ पाहिजे होते, पण काही गोष्टी सहजमध्ये होऊन जातात. मला वाटते की, हा प्रवास सोप्पा आणि आनंद देणारा व्हावा. पायलला एकच बेबी ट्यूब असतानाही ती प्रेग्नंट राहिली आहे.

पायलच्या प्रेग्नंसीच्या न्यूजनंतर काही लोक तिला शिव्या घालताना दिसत आहेत. पायल हिला एक मुलगी आणि दोन मुले आहेत आणि ती चाैथ्या बाळाची आई होणार आहे. (wife)आता अरमान मलिक नेटकऱ्यांना काय उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात कृतिका ही बरेच काळ होती. पायल, अरमान आणि कृतिका हे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बिग बॉसच्या घरात मोठे खुलासे करताना दिसले.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय