मध्य पूर्व आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगावर वाईट (premium) परिणाम होत आहे. या युद्धाचा फटका भारतालादेखील बसला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. परिणामी पेट्रोल डिझेलवर याचा परिणाम होत आहे. दरम्यान, एप्रिलच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. आजच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतदेखील वाढली होती. त्यानंतर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रिमियम इंधनाच्या दरात वाढ केली आहे.(premium) त्यामुळे प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. याला XP100 पेट्रोल असेही म्हटले जाते.दिल्लीत प्रीमियम पेट्रोलची किंमती १४९ रुपयांवरुन वाढून १६० रुपये झाली आहे. आता प्रति लिटरसाठी १६० रुपये मोजावे लागणार आहे. तर प्रीमियल डिझेलच्या किंमती ९१.४९ रुपयांवरुन ९२.९९ रुपये झाल्या आहेत. हे नवीन दर रात्री १२ वाजल्यापासून लागू झाले आहेत.

प्रीमियम पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याने वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे. (premium)प्रीमियम इंधन पेट्रोल डिझेलच्या तुलनेत महाग असते.चांगल्या मायलेज आणि इंधन परफॉर्मन्ससाठी या इंधनाचा वापर केला जातो.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. यामुळे डॉलरच्या तुलनेतरुपयादेखील घसरत आहे. याचसोबत रिफायनिंग आणि लॉजिस्टिक्सचा खर्च वाढल्याने इंधनाचे दर वाढत आहे. सध्या तरी प्रीमियम इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम सध्या तरी पेट्रोल डिझेलवर झाल्याचे दिसत नाहीये. मात्र, भविष्यात पेट्रोल डिझेलचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *