आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनांचा त्रास (hectic lifestyle) केवळ वयोवृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक तरुणांनाही उठताना-बसताना गुडघ्यात तीव्र वेदना जाणवू लागली आहे. चुकीचा आहार, पोषक घटकांची कमतरता आणि सतत बसून राहण्याची सवय यामुळे ही समस्या अधिक वाढताना दिसते. वेदना कमी करण्यासाठी अनेक जण पेन किलर औषधांचा आधार घेतात, मात्र त्याचा दीर्घकालीन वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे आता अनेक तज्ज्ञ नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वळण्याचा सल्ला देत आहेत. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अशाच एका सोप्या आणि प्रभावी लेपाबद्दल माहिती दिली आहे, जो घरच्या घरी काही मिनिटांत तयार करता येतो.

हा लेप तयार करण्यासाठी (hectic lifestyle) एरंडेल तेलात सुंठ पावडर, हळद आणि मेथीची पावडर मिसळून पेस्ट बनवली जाते. कोणतीही गरम प्रक्रिया न करता हा लेप सहज तयार होतो. तयार पेस्ट गुडघ्यांवर किंवा दुखत असलेल्या भागावर लावून काही तास किंवा रात्रभर ठेवली जाऊ शकते. या लेपातील घटकांचे गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात. एरंडेल तेल स्नायूंमध्ये खोलवर जाऊन ताठरपणा कमी करते, सुंठ रक्ताभिसरण सुधारते, हळद सूज कमी करते तर मेथी सांधे मजबूत करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे नियमित वापर केल्यास वेदनेत आराम मिळू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सांधेदुखीची समस्या टाळण्यासाठी आहारात प्रथिने, कॅल्शियम, (hectic lifestyle) मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. तसेच दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळणे, हलका व्यायाम करणे आणि शरीराची हालचाल वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र वेदना सतत जाणवत राहिल्यास किंवा वाढत असल्यास स्वतः उपचार न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी घेतलेली काळजीच भविष्यातील गंभीर समस्यांपासून बचाव करू शकते.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक