मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील नौदल शक्ती पुन्हा चर्चेत आली आहे. (developments) इराण आणि इस्रायल यांच्यातील ताज्या घडामोडींमुळे समुद्री मार्गांवरील नियंत्रण आणि लष्करी तयारीचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी सारख्या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणे किती निर्णायक ठरू शकते, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

जागतिक स्तरावर नौदल शक्तीच्या बाबतीत संयुक्त राज्य अमेरिका अजूनही अव्वल स्थानावर आहे. प्रगत तंत्रज्ञान, जागतिक पोहोच आणि अणुऊर्जेवर चालणाऱ्या ११ विमानवाहू नौकांमुळे अमेरिकेचे वर्चस्व निर्विवाद मानले जाते. या नौका म्हणजे समुद्रावरील चालते-बोलते लष्करी तळच आहेत, ज्यामुळे कोणत्याही भागात त्वरीत कारवाई करणे शक्य होते.
या यादीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. (developments) गेल्या काही वर्षांत चीनने वेगाने आपले नौदल बळकट केले असून नवीन विनाशिका आणि विमानवाहू नौकांची निर्मिती करून आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. तर रशिया तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची स्टेल्थ पाणबुडी क्षमता ही त्यांची खरी ताकद मानली जाते. आशियातील काही देशांनीही या स्पर्धेत वेगाने प्रगती केली आहे. इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सागरी संरक्षण क्षमतेत त्यांनी लक्षणीय वाढ केली आहे.
भारत या यादीत सातव्या क्रमांकावर असून तो (developments) सातत्याने आपले नौदल मजबूत करत आहे. INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत सारख्या विमानवाहू युद्धनौकांमुळे भारताने हिंद महासागरात आपली उपस्थिती अधिक भक्कम केली आहे. यामुळे प्रादेशिक स्तरावर चीनसारख्या शक्तींना तोलण्याची क्षमता भारताने निर्माण केली आहे. दुसरीकडे, इराण जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असला तरी त्याची सागरी रणनीती वेगळी आणि प्रभावी आहे. लहान पण वेगवान हल्लेखोर नौका आणि पाणबुड्यांच्या मदतीने तो अरुंद समुद्री मार्गांमध्ये मोठ्या शक्तींनाही आव्हान देऊ शकतो. विशेषतः फारसच्या खाडीतील त्याची उपस्थिती महत्त्वाची ठरते.
इस्रायल ३१ व्या स्थानावर असला तरी त्याचे नौदल अत्याधुनिक (developments) तंत्रज्ञानाने सज्ज आहे. डॉल्फिन श्रेणीच्या पाणबुड्या आणि अचूक हल्ला करण्याची क्षमता यामुळे इस्रायलची ताकद केवळ संख्येवर नाही, तर तांत्रिक कौशल्यावर आधारित आहे. एकूणच पाहता, जागतिक स्तरावर नौदल शक्ती ही केवळ जहाजांच्या संख्येवर ठरत नाही, तर तंत्रज्ञान, रणनीती आणि जागतिक पोहोच यावरही अवलंबून असते. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिक प्रकर्षाने समोर आली आहे.
हेही वाचा :
फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद
घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार
देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक