इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच Indian Premier League 2026 हंगामाची (action) जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्स संघाने गुजरात टायटन्सवर रोमांचक विजय मिळवत विजयी सलामी दिली. मात्र हा सामना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासाठी फारसा आनंदाचा ठरला नाही.विजयानंतरही श्रेयस अय्यरला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे विजयानंतरही पंजाबच्या कॅम्पमध्ये थोडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यू चंदीगड येथील महाराजा यादवींद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (action)येथे हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने 19.1 षटकांत 7 गडी गमावत 163 धावांचे लक्ष्य गाठत सामना 3 गडी राखून जिंकला.मात्र या सामन्यात पंजाब संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत. म्हणजेच संघाचा ओव्हर रेट कमी राहिला. या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरवर 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार हा हंगामातील पहिला ओव्हर-रेट उल्लंघन असल्यामुळे त्याला फक्त आर्थिक दंड ठोठावण्यात आला.

हा सामना श्रेयस अय्यरसाठी अनेक कारणांनी निराशाजनक ठरला. (action) फलंदाजी करताना त्याला हाताला दुखापत झाली आणि तो केवळ 18 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे राहिली नाही.या सामन्यात पंजाबच्या विजयात पदार्पण करणाऱ्या Cooper Connolly याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 44 चेंडूत नाबाद 72 धावा करत संघाला विजय मिळवून दिला आणि सामनावीर पुरस्कारही पटकावला.दरम्यान, मागील हंगामांप्रमाणे आता ओव्हर रेटसाठी थेट बंदी घालण्याचा नियम बदलण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार खेळाडूंना डिमेरिट पॉइंट्स दिले जातात. त्यामुळे सध्या श्रेयस अय्यरला फक्त आर्थिक दंड झाला असला तरी पुढील सामन्यांमध्ये अशा चुका टाळणे त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *