महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (update)आणि बारावी परीक्षेच्या निकालाकडे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची नजर लागली आहे. यंदा 2026 च्या निकालाची कोणतीही अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. पण गेल्या काही वर्षांच्या पद्धतीनुसार अंदाज बांधला तर मे महिन्यात निकाल येण्याची शक्यता दिसते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम संपवून आता फक्त निकालाचीच चिंता लागली आहे. बोर्डाकडून लवकरच याबाबत स्पष्ट सूचना येण्याची अपेक्षा आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.निकाल जाहीर झाल्यावर तो mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर सहज पाहता येईल. विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. बोर्डाच्या mahahsscboard.in या साइटवरही माहिती मिळू शकणार आहे.

खास सूत्रांच्या माहितीनुसार बारावीचा निकाल मे 2026 च्या पहिल्या (update)किंवा दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे 10 मे नंतर लागू शकतो. यंदा हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बोर्डाने अशी सवयच ठेवली आहे की निकालाच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी याची अधिकृत माहिती देते. विद्यार्थ्यांना हे जाणून घेऊन तयारी करायला हवी, जेणेकरून निकाल लागल्यावर ताबडतोब पाहता येईल.बारावी निकालानंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दहावीचे रिझल्ट समोर येऊ शकते. यामुळे दहावीचे विद्यार्थी थोडे अधिक वेळ थांबावे लागणार आहेत. पण ही पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे, त्यामुळे यंदाही तसाच क्रम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. विद्यार्थ्यांनी धीर धरून राहावे.
गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये बारावीचा निकाल 5 मे ला लागला होता (update)आणि दहावीचा 13 मे ला. 2024 मध्ये बारावी 21 मे ला आणि दहावी 27 मे ला जाहीर झाला. तर 2023 मध्ये बारावी 25 मे ला आणि दहावी २ जून ला आला. या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की मे महिन्यातच निकाल येतात आणि बारावी आधी, दहावी नंतर येतो. याच आधारावर यंदाही अंदाज बांधला जात आहे.बोर्डाने अजून 2026 च्या निकालाबाबत काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. अनेक फेक मेसेजेस फिरत आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. फक्त बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट आणि सूत्रांवरच लक्ष ठेवावे. निकालाची तयारी पूर्ण झाल्यावर बोर्ड स्वतःच सर्वांना कळवेल. या गोष्टी लक्षात घेऊन शांत राहा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक