WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी काही भन्नाट फिचर्स आणणार आहे.(feature) त्यामुळे तुम्हाला चॅटींग करणं आणखी सोपं जाणार आहे. तुम्ही यामध्ये महत्वाचे मेसेज न चुकता इतरांना पाठवू शकणार आहात. कारण यामध्ये महत्वाचे फिचर अपडेट होत आहे. ही सुविधा तुम्हाला लवकरच वापरता येईल. तसेच फिचर वापरायला सुद्धा खूप सोपं असणार आहे. जे व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर आहे. तुमचा महत्वाचा ताण यामुळे नक्कीच कमी होणार आहे.Whatsapp च्या या फिचरचं नाव रिमाइंड मी ‘Remind Me Feature’असं आहे. याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे असलेले मेसेज योग्य वेळेत योग्य त्या व्यक्तीला पाठवू शकता. तसेच तुम्ही यामध्ये टेक्स्ट असो, इमेज, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट असो यासगळ्याचे रिमाइंडर सेट करू शकता.

तुम्ही यामध्ये ठरलेल्या वेळेनंतर अॅप स्वतः नोटिफिकेशन पाठवून (feature) त्या मेसेजची आठवण करून देतं. त्यामुळे आता महत्त्वाचे मेसेज पुन्हा शोधण्याची गरज लागत नाही. सुरुवातीला हे फीचर काही निवडक युजर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात आलं होतं. पण आता ते हळूहळू जास्त युजर्सपर्यंत पोहोचत आहे. हे फीचर वापरण्यासाठी युजरला त्यांच्या ठरलेल्या मेसेज वर लॉंग प्रेस करुन ठेवावं लागतं. त्यानंतर वर दिसणाऱ्या रिमाइंड मी किंवा बेल आयकॉनवर टॅप करायचे आहे. यामध्ये २ तास, ८ तास, २४ तास किंवा कस्टम वेळ असे पर्याय दिलेले आहे. ठरलेल्या वेळेनंतर नोटिफिकेशनसोबत त्या मेसेजचा प्रिव्ह्यूही दिसतो.
Remind Me फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्टार केलेले मेसेज किंवा चॅट पिनपेक्षा (feature) उपयोगी आणि शोधायला सोपे असतात. स्टार फीचरमध्ये मेसेज सेव होतो, पण तो शोधण्यासाठी पुन्हा चॅटमध्ये जावं लागतं. पण रिमाइंड मी फीचरमध्ये अॅप स्वतः वेळेवर नोटिफिकेशन देतं, त्यामुळे युजरचा वेळ वाचतो आणि महत्त्वाची कामं चुकत नाहीत. हे फीचर त्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे जे एकाच वेळी पर्सनल चॅट, फॅमिली ग्रुप आणि ऑफिसचं काम पाहत असतात. महत्त्वाचे डॉक्युमेंट, फोटो किंवा व्हिडिओ विसरण्याची शक्यता यामुळे कमी होणार आहे. सध्या हे फीचर युजर्ससाठी बीट व्हर्जनमध्ये उपलब्ध केले आहे.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक