१ एप्रिल २०२६ रोजी नविन आर्थिक वर्षे सुरु झाले असून या दिवशी (electricity) अनेक महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांमधला एक फायदा मुंबईकरांना झाला आहे. यामध्ये वीज दरात कपात करण्यात आली आहे. कारण वीज पुरवणाऱ्या कंपन्यांनी म्हणजेच, बेस्ट, टाटा पावर आणि अडानी इलेक्ट्रिसीटी कंपन्यांनी त्यांचे विजेचे दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात येतील. यामुळे मे महिन्यात येणारे विजेचे दर कमी असणार आहेत.

महाराष्ट्रात आधीच महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (electricity) कडून महावितरणच्या वीजदर कपात करण्याची मंजुरी देण्यात आली होती. त्याचा फायदा मुंबईकरांना आता होणार आहे. तसेच 2030 पर्यंत हे दर टप्प्याटप्प्याने कमी होतील असे नियोजन करण्याच्या शासन तयारीत आहे. याचा फायदा मुंबईतल्या नागरिकांना, व्यावसायिकांना आणि औद्योगिक क्षेत्रातल्या ग्राहकांना सुद्धा होईल.

नव्या विजेच्या दरांनुसार बेस्टच्या ग्राहकांना 101 ते 300 युनिटसाठी(electricity) पुर्वी 7.43 रुपये द्यावे लागत होते. आता हे दर 7.17 रुपये करण्यात आले आहेत. तर 500 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी दर 14.11 रुपयांवरून 13.07 रुपये करण्यात आले आहेत.टाटा पॉवरच्या बाबतीत 101 ते 300 युनिटसाठी दर 7.96 रुपयांवरून 7.10 रुपये करण्यात आले आहेत. तसेच 301 ते 500 युनिटसाठी मोठी कपात करत हे दर 13.55 रुपयांवरून 11.64 रुपये करण्यात आले आहेत. अडानी इलेक्ट्रिसिटीनेही मोठी कपात जाहीर केली असून 0 ते 100 युनिटसाठी दर 6.38 रुपयांवरून 4.93 रुपये करण्यात आला आहे. यामुळे सगळ्यांना महागाईच्या दिवसांमध्ये ही एक मदत मिळणार आहे.

हेही वाचा :

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *