महिलेला आईचा आणि देवीचा दर्जा देणाऱ्या आपल्या देशामध्ये दुर्दैवाने (road)महिला सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. बिहारमध्ये शरमेने मान खाली जाईल अशी धक्कादायक घटना घडली आहे. दुकानामध्ये सामान आणायला गेलेल्या महिलेवर भररस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आल्या. या संतापजनक प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बिहारमधील नालंदा येथे भररस्त्यात महिलेवर सामुहिक लैंगिक (road)अत्याचार करण्यात आला. यावेळी इतर उपस्थित लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. बिहारमधील एका महिलेवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा २६ मार्चचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नालंदा जिल्ह्यातील अजयपूर गावातील या व्हिडिओमध्ये काही गावकरी एका महिलेला वाईट वागणूक देताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक पुरुष तिला अयोग्यरित्या पकडून ठेवलेले आणि ती सुटकेसाठी धडपडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

पीडित महिला किराणा दुकानातून सामान खरेदी करून घरी परतत होती.(road) वाटेत दबा धरून बसलेल्या काही तरुणांनी त्या महिलेला घेरले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने विरोध करत आरडाओरडा केला, तेव्हा आरोपींनी तिचे कपडे फाडून तिच्यावर अत्याचार केला. गावकरी जमा झाल्यावर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, पळून जाण्यापूर्वी त्यांनी या लज्जास्पद कृत्याचे व्हिडिओ काढले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी त्या महिलेला शिवीगाळ करताना आणि त्रास देताना दिसत आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती महाराष्ट्रात मजूर म्हणून काम करतो आणि घटना घडली तेव्हा तो गावात नव्हता. या घटनेबद्दल कळल्यानंतर तो काल नालंदा येथे आला. पीडितेच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधला.महिलेच्या म्हणण्यानुसार, ती पैसे जमा करण्यासाठी एका दुकानात गेली असताना काही गावकऱ्यांनी तिला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी याचे व्हिडिओ देखील काढले. तसेच हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेला तीन मुले आहेत. तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांना न्याय हवा असून सर्व नराधम लोकांना शिक्षा झाली पाहिजे.

हेही वाचा :

गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा

या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?

चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *