कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की सामान्य माणसाची ताकद किती जबरदस्त असू शकते. एकीकडे अफाट आर्थिक शक्ती असलेले काही प्रभावशाली घटक, त्यांच्या पाठीशी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी यंत्रणा उभी, असे सगळे जोर लावले गेले. पण या सगळ्यांना आव्हान देणारा आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभा ठाकणारा तो सामान्य कोल्हापूरकर होता.

सत्याच्या बाजूने, नैतिकतेच्या बाजूने आणि आपल्या हक्कांसाठी लढणारा हा कोल्हापूरकर शेवटी विजयी ठरला. चुकीला चूक म्हणण्याचे धैर्य, सत्यासाठी शेवटपर्यंत लढण्याची तयारी, ही कोल्हापूरच्या मातीची ओळख आजही टिकून आहे हे पुन्हा सिद्ध झाले.

या लढ्यात नेमके हरले कोण, हे फारसे महत्त्वाचे नाही. पण जिंकलेला मात्र स्पष्टपणे दिसतो — तो म्हणजे कोणताही जात, धर्म, पक्ष, संघटना यांचा आधार न घेतास, फक्त आपल्या हक्कासाठी पेटून उठलेला आणि एकजुटीने लढलेला कोल्हापूरकर.

हा कोल्हापूरकरच खरा शक्तिशाली आहे, कारण तो परिस्थितीशी झुंज देताना मातीशी नाते कायम ठेवतो, आणि सत्यासाठी माघार घेत नाही. कोल्हापूरच्या मातीने असे असंख्य लढवय्ये घडवले आहेत, जे वेळप्रसंगी अन्यायाविरुद्ध निडरपणे उभे राहतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *