कामावरून घरी परतल्यानंतर प्रचंड थकवा जाणवणं, कोणत्याही (constantly falling) गोष्टीत मन न लागणं, सतत झोप येणं किंवा भूक कमी होणं—अशा समस्या आजकाल अनेकांना जाणवतात. दिवसभराच्या धावपळीमुळे हे होतं असं आपण गृहित धरतो, पण काहीजणांच्या मते यामागे घरातील वातावरणाचाही मोठा संबंध असू शकतो. विशेषतः वास्तुशास्त्रानुसार, घरात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते.

वास्तुशास्त्र सांगतं की, घरात ऊर्जा संतुलित नसेल तर त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतात. अशावेळी घरात अनावश्यक तणाव, वाद-विवाद, आर्थिक अडचणी किंवा सतत अस्वस्थता जाणवू शकते. यालाच ‘वास्तुदोष’ असं म्हटलं जातं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
या पार्श्वभूमीवर काही सोपे (constantly falling) उपायही सांगितले जातात. उदाहरणार्थ, घराच्या मुख्य दरवाजावर कडू लिंबाची पाने बांधल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही, असा समज आहे. तसेच, बेडरूममध्ये शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी खिडक्यांनाही कडू लिंबाची पाने लावण्याचा सल्ला दिला जातो. कारण व्यक्ती सर्वाधिक वेळ रिलॅक्स अवस्थेत बेडरूममध्ये असते, त्यामुळे त्या जागेतील ऊर्जा थेट मन आणि शरीरावर परिणाम करते.
तज्ज्ञांच्या मते, घरात स्वच्छता, योग्य वायुवीजन आणि प्रकाश यासोबतच (constantly falling) सकारात्मक विचारसरणी ठेवली, तर अशा समस्यांवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. त्यामुळे केवळ वास्तुशास्त्रातील उपायांवर अवलंबून न राहता, जीवनशैलीतही योग्य बदल करणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी