घरी आलेले वीज बिल नकळत तुमच्याकडून हरवले असेल तर टेन्शन सोडा. वापरकर्ते आता काही मिनिटांतच आपल्या मोबाईल फोनवरून वीज बिले मिळवू शकतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे.

आजकाल प्रत्येक कामासाठी आधार कार्डसोबतच वीज बील देखील लागते. मात्र अनेक वेळा वीज बील आपल्याकडून हरवते, अशावेळी काय करायचे हे लोकांना पटकन समजत नाही. (electricity) त्यामुळे लोकांचे काम सोपे आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. आता तुम्ही फक्त १-२ मिनिटांत डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवर वीज बिल डाउनलोड करू शकता. तुमचे वीज बिल पाहण्यासाठी तुम्हाला आता वेगवेगळ्या वेबसाइट्स किंवा कार्यालयांना भेट देण्याची गरज नाही.नवीन अपडेटमुळे वापरकर्ते आता थेट डिजिलॉकर ॲपद्वारे त्यांची वीज बिले पाहू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे बिल थेट वीज कंपनीच्या डेटाबेसमधून येते आणि त्यावर असा टॅग असतो. याचा अर्थ, तुमचे बिल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आता वेगवेगळ्या साइट्सना भेट देण्याची गरज नाही. ऑनलाइन वीज बील डाउनलोड करणे खूपच सोपे आहे.
विज बील कसे डाउनलोड करावे
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.त्यानंतर तुम्हाला एक सिक्योरिटी पिन टाकावा लागेल.लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ‘वीज बिल’ शोधावे लागेल. (electricity) त्यानंतर, तुमची वीज कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.तुमचे बिल थेट ॲपमध्ये दिसेल आणि तुम्ही ते डाउनलोड करून सेव्ह करू शकता.डिजिलॉकरचे अनेक फायदे आहेत. तुमचे वीज बिल ॲपमध्ये सेव्ह केले जाईल आणि तुम्ही ते कधीही पाहू शकता. गरज भासल्यास तुम्ही ते डाउनलोड, प्रिंट, शेअर देखील करू शकता. हे वैशिष्ट्य मोबाईल आणि कॉम्प्युटर दोन्हीवर काम करते, म्हणजेच तुम्ही तुमचे कागदपत्रे कुठूनही – कधीही पाहू शकता.
नवीन प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे.डिजिलॉकरची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने मोबाईल ओटीपी, पिन आणि एन्क्रिप्शनसह सुरक्षेच्या अनेक पद्धती लागू केल्या आहेत. (electricity) यामुळे तुमची कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ते पाहू शकत नाही
हेही वाचा :
आता OTP विना व्यवहार, फसवणूक रोखण्यासाठी RBI चा रामबाण उपाय, ऑनलाईन फसवणुकीला आळा
तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही,
गॅस सिलिंडरवरून कडाक्याचे भांडण, नवऱ्याने ९ महिन्यांच्या गरोदर बायकोची केली हत्या