एप्रिल महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या आहेत.(Read) एप्रिल महिन्यात पहिल्याच आठवड्यात सलग सुट्ट्या आल्या आहेत. पहिल्या शुक्रवारी म्हणजे आज ३ एप्रिल रोजी बँका बंद आहेत. त्यानंतर आता उद्या शनिवारीदेखील बँका बंद असणार की सुरु असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकजण शनिवार म्हणून बँकेत जायचं ठरवतात. दरम्यान, उद्या बँका सुरु असणार आहेत.

बँकेला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. पहिल्या, (Read) तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँका सुरु असतात. त्यामुळे उद्या महिन्याचा पहिला शनिवार आहे. त्यामुळे बँका सुरु असणार आहेत. त्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर ते तुम्ही उद्या करु शकतात.आज अनेक राज्यांमध्ये बँकांना गुड फ्रायडे म्हणून सुट्टी आहे. त्यामुळे लाँग वीकेंड म्हणून उद्यादेखील बँकेला सुट्टी असेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र, बँका सुरु असणार आहे. या महिन्यात एकूण किती दिवस बंद असणार त्याची यादी वाचा.

देशातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
३ एप्रिल- गुड फ्रायडेनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी
५ एप्रिल- रविवार
११ एप्रिल-दुसरा शनिवार
१२ एप्रिल- रविवार
१४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी, तमिळ नवीन वर्ष या सणानिमित्त अनेक राज्यात बँकांना सुट्टी
१५ एप्रिल- त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये स्थानिक सणांमुळे बँकांना सुट्टी
१६ एप्रिल- बिहूनिमित्त बँका बंद राहणार
१९ एप्रिल- रविवार
२० एप्रिल- कर्नाटकात बसवा जयंती आणि (Read) अक्षय तृतीयानिमित्त बँकांना सुट्टी
२५ एप्रिल- चौथा शनिवार
२६ एप्रिल- रविवार

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *