कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे.(young)मुंबईतील भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल दीपक पिल्ले या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दीपक पिल्लई हा एल. बी.एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर उघडी होती. ज्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. तिथल्या प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले. परंतु कानातल्या हेडफोनमुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या तारांच्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाचे म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही नागरिकांचे जीव वाचले. (young)पण दीपकला वाचवता आले नाही. त्याच्या कानात हेडफोन होता. त्याला नागरिकांनी हाका मारल्या. त्याला आवाज दिला. पण हेडफोन लालेले असल्याने त्याला नागरिकांचा आवाज ऐकू आला नाही आणि वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर महावितरणला पण याची नागिरकांनी सूचना केली. पावसाळ्यात अशा उघड्या तारा अनेकांसाठी प्राणघातक ठरत आहे. महावितरणने तात्काळ याबाबत माहिती घ्यायला हवी होती. हलगर्जीपणामुळे एका तरुणाला जीव गमावावा लागल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर रस्त्यावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (young)हेडफोनपेक्षा प्राण महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विद्युत तारा अथवा लोखंडी विद्युत खांबाला पावसात हात न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या दीपकच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसला आहे. दीपक काही वेळेपूर्वीच घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांना धक्का बसला.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय