साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारुच्या नशेत (constable)असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली. एवढंतच नव्हे तर त्यानंतर त्याने एका महिला पोलिसाला रिक्षातून फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रिक्षाचालकाने त्या महिला कॉन्स्टेबलला कमीत कमी 200 मीटर फरपटत नेलं. हा संपूर्ण थरार तेथील दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. सातारा पोलीसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

दारू प्यायलेल्या, नशेत असलेल्या रिक्षाचालकाने मोळाचा ओढा परिसरात अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. त्यानंतर भाग्यश्री जाधव या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी रिक्षाचा पाठलाग करत या रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा चालकाने कॉलर पकडत हिसका देऊन त्यांना खाली पाडलं. मात्र त्यामुळे त्या महिला कॉन्स्टेबल पोलिसाच्या रेनकोट रिक्षाचा मागील अँगल मध्ये अडकल्याने रिक्षासोबत संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबल 200 मीटर हून अधिक फरफटत गेल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबाचा माळ येथून मनाली कॉर्नर पर्यंत असणाऱ्या दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास खंडोबाचा मॉल परिसरात एका रिक्षाचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत असताना ही घटना घडली. त्याने वाटेत 2-3 जणांना धडक दिली आणि तरीही तो थांबला नाही. (constable)ही घटना वाहतूक शाखेत तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री जाधव यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ जबाबदारी स्वीकारली आणि रिक्षा थांबवण्यासाठी चौकात त्या उभ्या राहिल्या.

पण रिक्षा त्यांच्याकडे येताच त्यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. रिक्षा थांबली नाही तेव्हा भाग्यश्री जाधवने एका वाटसरूची दुचाकी थांबवली आणि मागे बसून रिक्षाचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच त्यांनी रिक्षा पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच त्याच दरम्यान, रिक्षाचालकाने त्या पोलीस कॉन्स्टेबलचा हात झटकला. त्यानंतर तिचा रेनकोट रिक्षाच्या बंपरमध्ये अडकला आणि तिला रस्त्यावर ओढली गेली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक रस्त्यावर ओरडू लागले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाने धाडस दाखवले. त्याने धावत जाऊन रिक्षाचे हँडल धरले आणि पूर्ण ताकदीने ते थांबवले, तेव्हाच महिला पोलिस अधिकाऱ्याची सुटका झाली.
या घटनेत महिला पोलीस यांना हाताला आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातास जबाबदार असेलला आणइ बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या या बेभान रिक्षा चालकाला संतप्त नागरिकांनी पकडून चोप दिला.(constable) घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले. सध्या आरोपीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय