सध्या जगभरात IPLचे वारे वाहताना दिसत आहे.(recharge) सर्वत्र आयपीएलची तुफान क्रेझ पाहायला मिळते. वेळ मिळेल तिथे लोक आयपीएल पाहतात. त्यामुळे एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. Airtelने ५० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत रिचार्ज प्लान लाँच केला आहे. या स्वस्तात मस्त रिचार्ज प्लानचे सर्व अपडेट, जाणून घेऊयात.

Airtel ने ४८ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. (recharge) या प्लानमध्ये एक डेटा व्हाउचर असून यात ओटीटीचे फायदेही मिळतात. हा नवीन प्लान जवळपास सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. या नवीन प्लानद्वारे वापरकर्त्यांना ४जी डेटासह एका ओटीटी प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस मिळेल. या ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे वापरकर्ते आयपीएल इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा आनंद घेऊ शकतात. म्हणजे एक महिना न चुकता आयपीएल पाहता येणार आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी जिओहॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.

Airtel चा नवीन ४८ रुपयांचा रिचार्ज फक्त एका महिन्यापुरता मर्यादित आहे.(recharge) या प्लानसोबत वापरकर्त्यांना १ जीबी ४जी डेटा आणि जिओहॉटस्टार मोबाईलचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन मिळते. जरी तुम्हाला फक्त १ जीबी डेटा मिळत असला तरी, या प्लानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जिओहॉटस्टारचा ॲक्सेस. कारण आयपीएल २०२६ पाहण्यासाठी वापरकर्त्यांना जिओहॉटस्टारचा ॲक्सेस महत्त्वाचा ठरेल.जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनचा समावेश असलेला हा एकमेव एअरटेल डेटा प्लान नाही. १९५ रुपये, २७९ रुपये आणि ३६१ रुपयांसारखे इतर प्लान्सही उपलब्ध आहेत. कंपनीच्या २७९ रुपयांच्या प्लानमध्ये नेटफ्लिक्स आणि झी५ चे सबस्क्रिप्शनदेखील मिळते. हा एका महिन्याचा रिचार्ज प्लान आहे.

हेही वाचा :

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेपEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *