मध्य रेल्वेने रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी मेगा ब्लॉक मध्य (block)रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी रविवारी दि.५ एप्रिल रोजी उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.०५ वा. ते (block)सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्ग पोर्ट मार्ग वगळूनपनवेल येथून सकाळी १०:३३ वाजता ते दुपारी ३:४९ वाजता या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या ‘अप’ हार्बर मार्ग लोकल फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९:४५ वाजता ते दुपारी ३:१२ वाजता या वेळेत पनवेल-बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर मार्ग लोकव फेऱ्यांना रद्द करण्यात आले आहे.
पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘अप’ ट्रान्स-हार्बर मार्ग लोकल (block)फेऱ्या सकाळी ११:०२ वाजता ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी १०:०१ वाजता ते दुपारी ३:२० वाजेपर्यंत रद्द राहणार आहेत.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागावर विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर – नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.पायाभूत सुविधांची देखभाल करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ‘मेगा ब्लॉक’ अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासन दिलगीर आहे असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप