पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. (important decision) इराणने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद ठेवण्याच्या भूमिकेत काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या जहाजांना या मार्गाने जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. मात्र ही मुभा अटींसह असेल आणि प्रत्येक जहाजाला आधी इराणकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून (important decision) अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या महत्त्वाच्या सागरी मार्गावर मोठा परिणाम झाला होता. जगातील जवळपास 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होत असल्याने मार्ग बंद झाल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला. भारतसारख्या देशांना विशेषतः मोठा फटका बसला, कारण भारत आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा या मार्गावर अवलंबून आहे.
या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणवर दबाव वाढत होता. डोनाल्ड ट्रम्प (important decision) यांनीही कठोर इशारा देत हा मार्ग खुला करण्याची मागणी केली होती. वाढत्या उर्जा संकटामुळे आणि जागतिक व्यापार ठप्प होण्याच्या भीतीमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अशा परिस्थितीत इराणने घेतलेला हा निर्णय काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. जरी संपूर्णपणे मार्ग मोकळा करण्यात आलेला नसला, तरी अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी दिलेली परवानगी ही जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची पायरी मानली जात आहे. त्यामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी सुधारेल का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप