काही लोक आयुष्यात खूप मेहनत करतात, पण सुरुवातीला त्यांना (millionaires)अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे अनेकदा ते नशीबाला दोष देतात. मात्र अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात यश मिळण्याची वेळ वेगवेगळी असते. काहींना तरुण वयात मोठं यश मिळतं, तर काहींचं नशीब उशिरा फळफळतं. विशेषतः काही जन्मतारखांचे लोक वयाच्या 35 ते 40 नंतर अचानक मोठी प्रगती करतात, असे अंकशास्त्रात सांगितले जाते.

अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांक असलेल्या व्यक्तींना करिअर (millionaires)आणि आर्थिक क्षेत्रात मोठं यश उशिरा मिळतं. सुरुवातीच्या काळात संघर्ष असला, तरी पुढे त्यांना उच्च पद, चांगली नोकरी किंवा व्यवसायात मोठी भरारी घेण्याची संधी मिळते. त्यामुळे या जन्मतारखांचे लोक आयुष्याच्या उत्तरार्धात मोठी संपत्ती कमावतात.अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 1 असतो. या अंकाचा स्वामी ग्रह सूर्य मानला जातो. सूर्य हा सत्ता, नेतृत्व आणि प्रतिष्ठेचा कारक असल्यामुळे या लोकांना सरकारी नोकरी, प्रशासन किंवा राजकारण क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता जास्त असते.

या व्यक्तींना सुरुवातीला करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात.(millionaires) मात्र वयाच्या 40 वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता असते. काहींना उच्च पद मिळते, तर काही लोक राजकारणात प्रवेश करून मोठं नाव कमावतात.अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म 5, 14 आणि 23 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक 5 असतो. या अंकाचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता, व्यापार आणि संवाद कौशल्याचा कारक मानला जातो.

या जन्मतारखांचे लोक व्यवसायात खूप कुशाग्र असतात. ते कमी भांडवलातून (millionaires)व्यवसाय सुरू करून पुढे मोठं व्यावसायिक साम्राज्य उभं करू शकतात. मेहनत, कल्पकता आणि योग्य निर्णयक्षमता यांच्या जोरावर हे लोक वयाच्या 35 ते 40 नंतर मोठ्या आर्थिक यशाकडे वाटचाल करतात.अंकशास्त्रानुसार 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 6 अंतर्गत येतात. या अंकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह संपत्ती, सुख आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो.या व्यक्तींना पैशाच्या बाबतीत भाग्यवान मानले जाते. सुरुवातीला संघर्ष असला, तरी पुढे ते मोठ्या संपत्तीचे मालक बनू शकतात. अनेकदा हे लोक वयाच्या 35 ते 40 वर्षांनंतर आर्थिकदृष्ट्या स्थिर होतात आणि आलिशान जीवनशैलीचा आनंद घेतात.

हेही वाचा :

अजितदादांचा घातपात की अपघात, शरद पवारांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार

मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर मिळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *